*कांन्द्री संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले* *कांन्द्री सरपंच व सदस्य व रेल्वे कर्मचार्यां च्या पर्यंत्ना ने पाणी निकासी समस्या सोडविली*

*कांन्द्री संताजी नगरातील घरात पावसाचे पाणी शिरले*

*कांन्द्री सरपंच व सदस्य व रेल्वे कर्मचार्यां च्या पर्यंत्ना ने पाणी निकासी समस्या सोडविली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री वार्ड क्रमांक ५ संताजी नगर नेताजी सुभाषचंन्द्र पुतळा परिसरात रामटेक रेल्वे लाईन चा पुलाची साफ – सफाई नसल्याने रात्रीला आलेल्या जोरदार पावसाचे पाणी निकासी न झाल्याने साचुन लोकांच्या घरात शिरल्याने कांन्द्री ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांना बोलावुन संबधित रेल्वे प्रशासनास विनंती करून रेल्वे पुल साफ – सफाई करून सिमेंट पायल्या टाकुन पाणी निकासी चा मार्ग तात्काळ मोकळा करून पाणी निकासी समस्या सोडविली.


कांन्द्री वार्ड क्रमांक. ५ संताजी नगर नेताजी सुभाष चंद्र पुतळा परिसरात गुरूवार दिनांक.१७ जुन २०२१ च्या मध्यरात्री जोरदार पाऊस येऊन रामटेक रेल्वे लाईन पुलातुन पावसाचे पाणी निकासी न झाल्याने संपुर्ण परिसरात पाणी साचुन जलमय झाल्याने काही घरात पाणी शिरल्याने दिनांक.१८ जुन २०२१ ला पहाटे ५ वाजता कांन्द्री ग्रामपंचायत वार्ड सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, राहुल टेकाम, अरुणाताई हजारे यांनी सरंपच मा.श्री बळवंत पडोळे यांना सकाळी बोलावुन परिसर पाहुन पाणी निकासी मार्ग बंद झाल्याने सरपंच बळवंत पडोळे व सदस्य चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे चौकी येथे प्रत्यक्ष जाऊन सुचना दिली व कर्मचार्यांना सोबत घेऊन आले असता रेल्वे कर्मचारी यांनी पुलाची पाहणी करुन भारतीय रेल्वे पथक कार्यालयाचा मा. वरिष्ठ अधिकारी यांना कळविले आणि सरपंच बलवंत पडोळे यांनी दुरध्वनी द्वारे चर्चा करुन तातडीने कामास सुरवात करावी अशी विनंती केली. परंतु साचलेले पाणी काढणे गरजेचे असल्याने तातडीने डिझेल इंजिन लावुन पाणी रेल्वे लाईन पलीकडे फेकण्यात आले. कांन्द्री ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक ५ च्या नागरिकांच्या घरात या नंतर पाणी शिरून नुकसान होऊ नये. यास्तव सरपंच बलवंत पडोळे, स्थानिय सदस्य व सदस्या यांनी पुढाकार घेत भारतीय रेल पथक कार्यालय कामठी येथील विरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा अति तातडीने रामटेक रेल्वे लाईन पुल नंबर २ ची साफ सफाई करून नविन सिमेंट पायली टाकुन पाणी निकासी मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल सर्व कामगार, कर्मचारी, भारतीय रेल्वे पथक कामठी तसेच ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी व कामगार यांच्या अथक प्रयत्नाने पाऊसा च्या पाण्यामुळे लोकांचे होणार्या नुकसानीची दखल घेत त्वरित पाणी निकासी समस्या सोडविण्यास सिंहा चा वाटा घेत तात्काळ समस्या सोडविल्या बद्दल कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बळवंत पडोळे, सदस्य चंन्द्रशेखर बावनकुळे, अरुणाताई हजारे, राहुल टेकाम , नरेश डांगरे, अतुल हजारे, विलास कवळे, राॅय सर व मान्यवर नागरिकांचे परिसराती नागरिकांनी मनस्वी आभार व्यक्त केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …