*कामठी येथे भाजपा पदाधिकार्यांनी केले निषेध आंदोलन*
*संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – कामठी तालुक्यात शासकीय आढावा बैठक कि मध्ये संवैधानिक पदावर असलेल्या आमदार टेकचंद सावरकर यांच्या अपमान केल्यानंतर सोशल मीडिया वर व्हिडियो व्हायरल झाल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज झाले असुन कामठी शहरात भाजपा पदाधिकार्यांनी अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक येथे घटनेचा जाहिर निषेध करीत महाविकास आघाडी सरकार च्या नेत्यांन विरोधात जोरदार प्रदर्शन करुन संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
कामठी तालुक्यात सोमवार दिनांक १४ जुन २०२१ ला महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री सुनिल केदार यांच्या शासकीय बैठकी मध्ये संवैधानिक पदावर असलेल्या सन्माननीय आमदार श्री टेकचंद सावरकर यांची बैठक ची व्यवस्था बरोबर न केल्याने , विकासाच्या विषयावर बोलु न दिल्याने , काॅंग्रेस पार्टी चे महासचिव सुरेश भोयर व काॅंग्रेस चे कार्यकर्ते आमदार टेकचंद सावरकर यांच्या आंगावर धावुन आल्याने आमदारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देऊन त्यांचा अपमान केला .याचा जाहिर निषेधार्थ भाजपा कामठी शहर च्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक येथे विकासाचा विषयावर बोलु न देणर्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा दादागिरी करणारा नेत्यान व कार्यकर्त्यांचा विरोधात जोरदार प्रदर्शन करुन संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया भाजपा पदाधिकारी , सुनील खानवणी , विमल झमतानी , नरेश परवानी , पुष्पराज मेश्राम , मंगेश यादव , राज हडोती , राजेश देशमुख , उज्ज्वल रायबोले , विनोद संगेवार , प्रतीक पडोळे , विजय कोंडुलवार , डॉ महेश महाजन , वसी हैदरी , गोपाल सिरिया , संदिप पोहेकर , प्रमोद वर्णम , सतिश जैस्वाल , अजय पंचोली सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
*जनता अरेरावी करणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवतील -*
*संजय कनोजिया अध्यक्ष भाजपा कामठी शहर*
विकास कामे करता येत नाही लोक प्रतिनिधींनी व सर्वसामान्य नागरिकांनी जाॅब विचारला तर महाभकास आघाडी शासनचे नेते गुंडागिरी वर येतात हे सर्व राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे .
जनता अरेरावी करणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवतील . असे मत भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांनी व्यक्त केले आहे .