Breaking News

*चाचेर – निमखेडा येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन* *जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास करु – जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे*

*चाचेर – निमखेडा येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन*

*जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास करु – जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे*

मौदा – मौदा तालुक्यातील चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधील ईसापुर , आजनगाव , भेंडाळा , मांगली , निमखेडा , हिंगणा व नेरला या गावात विविध विकास कामाचे भुमीपुजन बुधवार दिनांक १६ जुन २०२१ ला जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा हस्ते करण्यात आले . या प्रसंगी जिल्हा परिषद चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य , जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे , ज्ञानेश्वर वानखेडे , ज्ञानेश्वर चौरे , खेमराज चापले , प्रमोद बरबटे , नीता फोटफडे , दिनकर घोटाळे , राधेश्याम मानकर , व्यंकट रामराव नाडीपिल्ले , ओमदेव देशमुख , मनोज कडु , विनायक घाटबांधे , भोजराज दुबे , सिन्नु यागंट्दी , विनायक महादुले , दिगांबर महादुले , दशरथ महादुले , शरद हारोडे , सुधांशु खोब्रागडे , चंन्द्रकला भिवगडे , ताराचंद भिवगडे , गजानन देशमुख , दत्तु करडभाजने , विलास लोणारे , मंजुषा टाळे , भोजराज ढोमने , संजय सपाटे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*विकासकामे करण्याची तळमळ माझ्या मनात आहे – जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे*

चाचेर – निमखेडा भुमिपुजन सोहळा कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले कि जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल चा विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असुन कोणतेही गाव विकासापासुन दुर राहु नये म्हणुन विकासकामे करण्याची तळमळ माझ्या मनात असुन प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्राचा आपण नक्कीच चेहरा मोहरा बदल हु असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केले .

*येत्या काळात इतर ही गावांना शहराचे रुप देणार – जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे*

चाचेर – निमखेडा सर्कल मधील गावागावात शहरा प्रमाणे सिमेंट रस्ते , सांडपाण्याचा भुमीगत नाल्या व्हाव्या . अशी मनोमत इच्छा व्यक्त होती .याकरिता अर्ज विनंतीच्या माध्यमातुन वारंवार पाठपुरवठा करुन सन २०२० – २१ च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोट्यवंधीचा निधी मंजुर करुन घेतला . चाचेर – निमखेडा सर्कल मधील ईसापुर , आजनगाव , भेंडाळा , मांगली , निमखेडा , हिंगणा व नेरला सह आदि गावात मुलभुत सुविधांच्या विकासकामाचे भुमीपुजन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा हस्ते झाले . येत्या काळात चाचेर – निमखेडा सर्कल मधील इतर ही गावांना शहराचे रुप येणार आहे .
चाचेर – निमखेडा सर्कल च्या मतदारांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …