Breaking News

*बँरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविघालयात आँनलाईन आतंरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते*

*बँरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविघालयात आँनलाईन आतंरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- बँरि. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षा व क्रिडा विभाग तसेच IQAC विभागातर्फे आँनलाईनच्या माध्यमाद्वारे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. आर. जी. टाले होते.योगगुरु श्री. दिनेशजी वेखंडे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मखर्गदर्शक होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्ंथपाल व नँक समन्वयक प्रा. डाँ. संगीता चोरे तसेच शारीरिक विभाग प्रमुख प्रा.डाँ.राजेन्द्र राऊत यांनी केले .


योगा आपल्या आयुष्याला उदंडता प्रदान करते व शरीर निरोगी राहुन सुदृढता लाभते म्हणुन आपण नियमित व्यायाम व योगा करावा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य आर.जी.टाले यांनी केले . योगगुरु श्री दिनेशजी वेखंडे यांनी प्रत्यक्ष प्रात्याक्षीकांसह योगासनावर भर देत योगा केल्याने स्नायुंना बळकटता लाभते व शरीर निरोगी बनते असे सांगीतले.आँनलाईन द्वारे त्यांनी सांगीतलेल्या योगासनांचा लाभ समस्त प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यानी घेतला.कार्यक्रमात समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेन्द्र राऊत यांनी केले व सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डाँ. संगीता उमाळे यांनी केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …