Breaking News

*भर दिवसा कन्हान पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला* *एक आरोपी पोलीसाच्या ताब्यातुन पसार* *कन्हान पोलीसांच्या कामगिरी वर प्रश्न निर्माण ?*

*भर दिवसा कन्हान पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला*

*एक आरोपी पोलीसाच्या ताब्यातुन पसार*

*कन्हान पोलीसांच्या कामगिरी वर प्रश्न निर्माण ?*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहर येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे यांच्या घरावर गावगुंडांनी अश्लिल शिवीगळ करित दरवाज्यावर लाथ, दगड व शस्त्राने मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हमला केला. अंगणात असलेल्या हॅगनर कार चे काच फोडले . भर दिवसा ही घटना घडल्याने पत्रकारांमध्ये व नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन कन्हान पोलीसांच्या कामगिरी वर प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांच्या व फिर्यादी यांचे तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .


सोमवार दिनांक.२१ जुन ला सकाळी ९ वाजता च्या दरम्यान पत्रकार रमेश गोडघाटे हे आपल्या कुटुंबासह संताजी नगरातील आपल्या घरी असतांना आरोपी बंटी शर्मा व दिपक गडे हे दोघे पत्रकार गोडघाटे यांच्या घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिविगाळ करित होते. अचानक होत असलेल्या प्रकाराबद्दल पत्रकारा सह कुटुंबीय भयभीत झाले व आतुन दरवाजा बंद करून घेतला. तेव्हा बाहर निकल तुझे जानसे मारुंगा . म्हणत लाकडी दरवाज्यावर लाता, दगड व शस्त्राने मारून मेरी थाने मे शिकायत क्यो किया. मेरे धंदे के बारे मे पेपर मे न्युज क्यो छपाया म्हणत सदर गुंडांनी अंगणात उभी असलेल्या वेगनआर चारचाकी गाडी – एम एच क्र.- ३२८८ ची काच फोडली. व निघुन गेले. परत दहा मिनिटाने पुन्हा दोघेही आरोपी घटनास्थळी दुचाकीने आले असता त्यांना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पण त्यातील बंटी शर्मा हा कन्हान पोलीसांच्या हातात तुर्रा देत तावडीतून सुटून फरार झाल्याने कन्हान पोलीसांच्या कामगिरी वर प्रश्न निर्माण झाले असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर दिपक गडे याला अटक केली. कन्हान पोलीसांनी नगरातील नागरिकांच्या व फिर्यादी यांचे तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरूध्द कलम २९४, ५०४, ५०६, ४२७, ३४ भादंवि नुसार गुन्हा करुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …