*आर्वी तपस्या पब्लिक स्कूल मध्ये ऑनलाईन इंटरनॅशनल योगा दिवस साजरा*

वर्धा प्रतिनिधी:- पंकज रोकडे
आर्वी – विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित तपस्या पब्लिक स्कुल(सी.बी. एस.ई.)आर्वी च्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग’दिवसाचे औचित्य साधून ‘इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल ‘या उक्तीला खरोखरच सार्थ ठरविले.कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुपात शाळेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी नसतांना आणि दरवर्षी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न करण्यामध्ये खंड न पडावा या करिता मुंबई येथील सुप्रसिद्ध योग शिक्षिका सौ.कांचन गावते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात जोडून योगाचे महत्व व सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगासनाची आवश्यकता विद्यार्थ्यांना सहज -सोप्या पद्धतीने सांगितली.या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.शिवानी नि.देशपांडे मॅडम यांनी शाळेने प्रत्यक्ष रुपात ऑनलाईन पद्धतीने साकारलेल्या योग कार्यक्रमाचा व आपल्या व्यस्थ वेळतालिकेत आमच्या शाळेसाठी योग शिक्षिका सौ.कांचन गावते मॅडम यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल स्तुतिसुमने उधळली. या सुंदर आयोजनाचा विद्यार्थी मित्रांनी मनमुराद आनंद लुटला तसेच पालकांनी सुद्धा या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर राऊत तर आभार प्रदर्शन श्री संदीप घपाट सर यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता शाळेचे क्रीडाशिक्षक श्री वैभव देशमुख सर,मनीष सराड सर ,मनोज चांदूरकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले .कार्यक्रमाची सांगता शाळेचे संगीत शिक्षक दिपक शिंदे यांच्या योग ही जीवन है या गीताने झाली.
Maharashtra News Media सच की आवाज