*घरातील व्यक्ती मृत्यू झालेल्या कुंटुंबियांना आर्थिक मदत*
चंद्रपुर – मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री जिल्हा चंद्रपूर यांचे कडून सावली तालुक्यातील विविध गावातील कोरोना काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये रैयतवारी येथील स्वर्गीय वासुदेव पोइनवार यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. ही आर्थिक मदत स्वर्गीय वासुदेव पोईनवार यांच्या पत्नी विमल पोईनवार यांच्याकडे देण्यात आली. आर्थिक मदत देण्यासाठी उपस्थित विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बोदलकर, प्रियंका हुलके, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक बबनराव सोनटक्के , माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम जुमनाके, हिवराज तिवाडे तसेच गावातील इतर व्यक्ती उपस्थित होते. मिळालेली आर्थिक मदत पाहून कुटुंबीयांनी मा. विजयभाऊंचे आभार मानले.
Maharashtra News Media सच की आवाज