*पत्रकार स्वर्ग श्री राजेश शर्मा यांच्या जयंती निमित्य कोरोना योद्धांना मास्क वाटप*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच चे माजी संस्थापक व संदेश पेपर चे वार्ताहार स्वर्ग श्री राजेश शर्मा यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या गार्डन मध्ये करून स्वर्ग श्री राजेश शर्मा यांच्या जयंती निमित्य प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे डॉक्टर योगेश चौधरी व कन्हान पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या हस्ते आशा वर्कर, नर्स या कोरोना योद्धांना मास्क व गुलाबाचे फुल वाटप करून स्वर्ग श्री राजेश शर्मा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

मंगळवार (दि.२२) जुन ला कन्हान शहर विकास मंच चे माजी संस्थापक व संदेश पेपर चे वार्ताहार स्वर्ग श्री राजेश शर्मा यांच्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान च्या गार्डन मध्ये स्वर्ग श्री राजेश शर्मा यांच्या प्रतिमेला डॉ योगेश चौधरी यांच्या हस्ते व पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या हस्ते पुष्पहार माल्यार्पण करून, केक कापुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कोरोना काळात आपले जीव धोक्यात घालुन दिवस रात्र नागरिक व रूग्णाची सेवा करणार्या प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी, नर्स, आशा वर्कर या कोरोना योद्धांना मास्क , केक व गुलाबाचे फुल वाटप करून सत्कार करित स्वर्ग श्री राजेश शर्मा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भरत सावळे, रामगोपाल शर्मा सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे, सुषमा मस्के, वैशाली खंडार, पौर्णिमा दुबे आदि ने सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज