*कंत्राटी कामगारांचे प्रेत पोचले अल्ट्राटेक प्रशासकीय भवनात* *मागण्या मान्य होईपर्यंत मृत शरीर उचलणार नाही सिलारकर कुटुंबीयांचा प्रशासनाला इशारा. कामगारांमधे आक्रोश* *माजी खासदार नरेश बाबू पुगलीया यांच्या मार्गदर्शनात मागण्या मान्य झाल्या*

*कंत्राटी कामगारांचे प्रेत पोचले अल्ट्राटेक प्रशासकीय भवनात*

*मागण्या मान्य होईपर्यंत मृत शरीर उचलणार नाही सिलारकर कुटुंबीयांचा प्रशासनाला इशारा. कामगारांमधे आक्रोश*

*माजी खासदार नरेश बाबू पुगलीया यांच्या मार्गदर्शनात मागण्या मान्य झाल्या*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये बीएफ कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिकल्स या कंत्राटी ठेकेदाराकडे आवळपुर निवासी ईश्वर संभाजी सिल्लोडकर वय 49 वर्ष हे दिनांक 10 जून रोजी कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व्यवस्थापनाच्या अधिनस्त असलेल्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचाराकरिता जखमीला चंद्रपूर येथील मेरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे पाठवण्यात आले परंतु ढासळत असलेली प्रकृती लक्षात घेता डॉक्टर मेहरा यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला, मात्र तब्बल अकरा दिवसानंतर उपचार घेत असताना दिनांक 21 जून रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली कर्तव्यावर असताना अपघात झाल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या पूर्वी घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत या ठिकाणी कार्यरत असलेल्या येथील अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघटना या संघटनेच्या वतीने मृतकाच्या परिवाराला योग्य तो मोबदला व त्याच्या वारसाला नोकरी या मागण्यांना घेऊन माजी खासदार संघटनेचे अध्यक्ष नरेश बाबू पुगलीया यांच्या मार्गदर्शनात चर्चेला सुरुवात झाली.


या अणुषंगाने दरम्यान चर्चा निष्फळ ठरल्याने शेवटी कुटुंबियांनी ईश्वरचे मृत शरीर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणून उभे केले, वारंवार चर्चा करूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने शेवटी कंपनी प्रशासनाच्या प्रशासकीय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मृत शरीराला आणून ठेवण्यात आला जोपर्यंत कुटुंबाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून कोणत्याही प्रकारे मृत शरीर हलवण्यात येणार नाही .अशा प्रकारचा पवित्रा येथील संघटनेचे महामंत्री साईनाथ बुच्चे .

संघटनेचे उपाध्यक्ष शिवचंद्र काळे . यावेळी राजूरा येथील एसडीपीओ साहेब .आणी सिमेंट कंपनी च्या वतीने अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मुख्य अधिकारी युनिट हेड एकरे साहेब. संजय शर्माजी . पाटक जी. समविचारी बैठकीत लगुनगेस्ट कार्यालयात तरजोळ चारवाजताच्या सुमारात करण्यात आली. मागील एक अशीच घटना घडली होती त्या परिवाराला जे मिळाले ते याही शिलारकर परिवारातील लोकांना मीळेल असी बोलनी या वेळी झाली . या पुर्वी ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात घटनास्थळी दंगा नियंत्रक पथक दाखल करण्यात आले, व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शेवटी कंपनी व्यवस्थापन अधिकारी युनिट हेड एकरे यांनी हा आपला निर्णय माजी खासदार नरेश बाबू पुगलीया यांच्या मार्गदर्शनात मागे घेतला आहे , घेतल्यानंतर येथील विशेष शिलारकर यांना जो खर्च झाला तोही देण्यात येईल मुलाला कंपनीच्या कंपनीत कामावर घेतले जाईल अशी या वेळी तळजोळ करण्यात आली.

याद्वारे मृत ईश्वर शिलारकर यांचे पार्थिव कंपनी व्यवस्थापनाच्या प्रशासकीय भवनाच्या प्रवेश द्वाराजवळून उचलण्यात आला, आणी सह आवारपूर येथे नेण्यात आला आणी इश्वर शिलारकर यांच्या पार्थिवावर 7-30 वाजता अंत्यसंस्कार आवारपूरात करण्यात आला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …