Breaking News

*कोविड योद्धाचे सत्कार*

*कोविड योद्धाचे सत्कार*


चंद्रपुर – कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाची पुरेपूर काळजी घेऊन पूर्ण वेळ कर्तव्यावर असणारे दुर्गापूर केंद्रातील डॉक्टर मा. अमितजी जैस्वाल, दवाखान्यातील नर्सेस व कर्मचारी वर्ग यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल गाववासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनुषंगाने आज शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या केंद्रात नव्याने रुजू झालेले डॉक्टर आशिषजी वाकडे यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शक श्री. सुरेश तावाडे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, सरपंच सौ. पूजाताई मानकर, उपसरपंच प्रज्योत जी पुणेकर, माजी उपसरपंच असिफ भाई पठाण, जॉन्सनजी नळे, ग्रामपंचायत सदस्य सुमेघजी मेश्राम, राहुलजी भगत उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मांदाळे यांनी केले होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …