*नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावर कार दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू*

*भीषण अपघातात आई मुलाचा जागीच मुत्यु*
कामठी – नागपूर जबलपूर महामार्गावरील लीहगांव येथे आज दिनांक 22 जून रोजी सकाळी अपघातात आई मुलाचा जागीच मुत्यु झाला. अनिकेत गोपाळ खुरपडी वय 21 व आई मनीषा गोपाळ खुरपडी वय 44 राहणार गादा गांव असे मृतक आई मुलाचे नाव आहे. मिडल्या माहिती अनुसार दिनांक 21 जून रोजी आई मुलगा उमरेड तालुक्यातील वरद गावात आपल्या दुचाकी ऍक्टिव्ह क्रमांक Mh 40 BM3914 ने गाव पूजा करिता गेले होते. आज 22 जून रोजी सकाळी आपल्या घरी गादा ता. कामठी येथे परत येत असता लिहंगाव जवड चार पदरी मार्गावर चार चाकी वाहन मारोती सुजूकी क्रमांक MH 49 BK 1711 ने मागुन जोरदार धडक दिली त्यात दुचाकी चालक आई मूलाचा मुत्यु झाला तर घटने नंतर चार चाकी चालक घटना स्थळ वरून पसार झाला असून कामठी नवीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ।
Maharashtra News Media सच की आवाज