*काटोल सह नागपूर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर!*

*काटोल तालुक्यातील दोन जि प व दोन पं स च्या पोटनिवडणुक १९जुलै तर मतगणना २०जुलै रोजी*
कोंढाळी प्रतिनिधि -दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान, तर २० जुलै रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी घोषणा केल्या नंतर २३जून रोजी काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंम्बरकर यांचे उपस्थित काटोल चे तालुका निवडणूकनिर्णय अधिकारी अजय चरडे यांनी काटोल तालुक्यातील येनवा व पारडसिंगा जि प विभाग तसेच पंचायत समिती च्या लाडगाव व मेटपांजरा गणांमध्ये पोट निवडनूक होनार असल्याची माहिती देण्यात आलीआहे.
नागपूर जिल्ह्यांचा स्तर- १ मध्ये समावेश झाला आहे. काटोल तालुक्यातील पारडसिंगा व येनवा या दोन जिल्हा परिषदा व लाडगाव आणि मेटपांजरा दोन पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. २९ जून ते ५ जुलै २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. ४ जुलै रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ६ जुलै रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे ९ जुलैपर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी १२ जुलै २०२१; तर अपील असलेल्या ठिकाणी १४ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २० जुलै रोजी मतमोजणी होईल, असेही अजय चरडे यांनी सांगितले.
.
Maharashtra News Media सच की आवाज