*हिंदू साम्राज्य दिनोत्सव 2021 निमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले
सावनेरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,सावनेर नगर व्दारे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

*हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी, जेष्ठ शुक्ल १३ शके १९४३ म्हणजेच दिनांक २३ जून २०२१ ला हिंदू साम्राज्य दिनानिमित्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा चे निकालाची घोषणा शासनाने दर्शविलेल्या सुरक्षा नियमांना पाळून करण्यात आली व सर्व सहभागी स्पर्धाकांना प्रोत्साहनात्मक बक्षीस कार्यक्रम स्थानी भेट देण्यात आली.*
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. विभाग सरसंघचालक जयंतराव मुलमुले व मा. नगर संघचालक डॉ नितीन पोटोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पारितोषिक प्रदान करण्यात आली. प्रमुख वक्ते अँड् अभिषेक मुलमुले यांनी हिंदू स्वराज दिवसाचे महत्व पटवून सांगितले.*
*स्पर्धेच्या गट अ : वर्ग 5 वी ते 7 वी मधे प्रथम पुरस्कार : कु. यशस्वी डाखोळे (सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल),द्वितीय पुरस्कार : श्री. कार्तिक हांडे (के. जॉन पब्लिक स्कूल),तृतीय पुरस्कार : कु. मनस्वी राऊत (सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल)*
*गट ब: वर्ग 8 वी ते 10 वी प्रथम पुरस्कार : कु. रिद्धी डाखोळे (सारस्वत सेंट्रल पब्लिक स्कूल),द्वितीय पुरस्कार : कु. अवंति शंभरकर (सारस्वत पब्लिक स्कूल),तृतीय पुरस्कार कु. कल्याणी राजेंद्र डोंगरे (सारस्वत पब्लिक स्कूल)*
*गट क : वर्ग 11 वी ते महाविद्यालयीन विद्यार्थी यात प्रथम पुरस्कार चेतन रामेश्वर लिखितकर (कामठीपॉलिटेक्निक कॉलेज),द्वितीय पुरस्कार : कु. अंजली संजय ढाले (भालेराव कनिष्ठ महाविद्यालय),तृतीय पुरस्कार : कु. चंचल रामेश्वर लिखितकर (महात्मा फुले कॉलेज वरुड).यांनी प्राप्त केले*
*सदर प्रसंगी विद्यार्थ्याचे पालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावनेर नगर चे कार्यवाह श्री. प्रविणजी नारेकर, श्री. श्रीराम आवदे, श्री. लक्ष्मीकांतजी पोटोडे, अँड्. तेजसजी कुबीटकर कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज