*रोटरी क्लब व्दारे मातोश्री वु्ध्दश्रमास सोलर पँनल दान*

*रोटरी क्लब व्दारे मातोश्री वु्ध्दश्रमास सोलर पँनल दान*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर – मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे रोटरी क्लब ऑफ नागपुर ईशान्य यांचे वतीने ग्रीन एनर्जी इन सोलर पॅनल चे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश टावरी, सचिव नरेश बलदुवार, तसेच भारतीय आदिम जाति सेवक संघाचे सचिव विजय शेंडे, उपाध्यक्षा सौ दिपाली खोबरागडे व मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री प्रदीप चंदन बटवे यांचे उपस्थितीत पार पडला.

*भारतीय आदिम जाति सेवक संघ विदर्भ नागपूर द्वारा संचालित मातोश्री वृद्धाश्रम आदासा गेल्या तेवीस वर्षांपासून शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय सुरू असून देणगी दातांच्या भरोशावर वृद्धाश्रमाचा खर्च भागविला जातो त्यात महत्त्वाचा खर्च म्हणजे इलेक्ट्रिक बिल जे की आश्रमाला भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ नागपुर ईशान्य यांच्यावतीने ग्रीन एनर्जी सोलर पॅनल डोनेट करून खूप मोठी मदत आश्रमाला करून दिली. ज्यामुळे पुढील पंचवीस वर्षात पन्नास लाखांची बचत होऊन ज्याचा उपयोग बिल्डिंग देखभाली करिता होऊ शकतो असे मनोदय रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री योगेश टावरी यांनी व्यक्त केले. संस्थेचे सचिव श्री विजय शेंडे यांनी रोटरी क्लब चे आभार मानत संस्थे करिता ही अविस्मरणीय भेट ठरली असून पुनश्च सर्वांचे आभार मानले.*


*कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संस्थेचे सभासद श्री संजय मेनजोगे, अदविका भापकर व संस्थेचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …