*जुनी झोपडपट्टी बोखारा मैदानावर स्लम सॉकर टुर्नामेट चे यशस्वी आयोजन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- जुनी झोपडपट्टी फुटबॉल टूर्नामेंट बोखाराद्वारा आयोजित विभागीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात बालमनावर होत असलेला परिणाम त्यांचे मानसिक स्वास्थ व खेळा पासून वंचित असल्यामुळे शारीरिक दुर्बलता यांचा विचार करून स्लम सॉकर बोखारा चे संचालक विजय बारसे यांनी विशेषता स्लम क्षेत्रातील बालकांचा विचार करून फुटबॉल खेळाच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. संचालक विजय बारसे हे अनाथ मुलांना आधार देत अनाथआश्रमा द्वारे मुलांचा सांभाळ करतात. हे सामाजिक कार्यकर्ते असून ‘सत्यमेव जयते ‘या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमातही त्यांचा सत्कार करून त्यांचा जीवनपट दाखविण्यात आला होता. 2021_ 22 या वर्षात प्रदर्शित होणारा सिनेकलाकार अमिताभ बच्चन असलेला ‘झुंड ‘ हा चित्रपट त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आहे.सामाजिक बांधिलकीला जपत कोविड_19 मधील लॉकडाऊनच्या शिथिल काळात बालकांच्या खेळातील रुचीला प्राधान्य देत विभागीय स्लम सॉकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलेआहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या संचालिका ,सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ लता वाघ लाभल्या.उद्घाटनाप्रसंगी पारंपारीक पद्धतीने फुटबॉल स्पर्धेचे होत असलेले उद्घाटन या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ‘नमस्कार’ या पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या सौ लता वाघ यांनी खेळाडूंना होऊ घातलेल्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेकरिता कोराडी, झिंगाबाई टाकळी, बोखारा कामठी, चणकापूर, मानकापूर हिंगणा, मार्टिन नगर इत्यादी भागातील स्लम एरियातील खेळाडूंचा सहभाग आहे.स्लम सॉकर स्पर्धेदरम्यान कोविड१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. कार्यक्रमाला उमेश देशमुख व इतर कर्मचारी टीमचे संपूर्ण सहकार्य या टूर्नामेंट दरम्यान लाभले.