Breaking News

*बहुजन आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तायवाडे महाविद्यालयात साजरी*

*बहुजन आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तायवाडे महाविद्यालयात साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- त्याकाळात बहुजन समाजावर मोठ्‍या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होते,राजकीय निर्णयप्रक्रियेत बहुजनांना कोणतेही स्थान नव्हते म्‍हनूण बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावुन घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन असोसियेशनची स्‍थापना केली व बहुजनांच्या हितसंबंधाना वाचा फोडली.डॉ.आंबेडकराच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशात पाठविले.अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

आतंरजातीय विवाहाला मान्यता देणारा पुनर्विवाह कायदा करण्यास ब्रिटिशांना भाग पाडले.जातीभेदाला विरोध केला.मूकनायक या वर्तमानपत्रातून समताधिष्टित समाज आणि धर्मनिरपेक्षता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले.अशा महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्‍त आज संपुर्ण राज्यात “सामाजिक न्याय दिवस”म्‍हनूण साजरा केला जातो.म्‍हनूण त्यांच्या विचांराची आज देशाला तसेच जगाला गरज आहे.


तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे महाविद्‍यालयातील जयंती-पुण्यतिथि समीतीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्‍यात आली .याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे अध्यक्षस्थानी उपस्थित हाेत्या . डॉ.शरयू तायवाडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
समितीचे समन्वयक डॉ.अभिवीलास नखाते यांनी प्रास्‍ताविकात छत्रपती शाहु महाराजांच्या कार्याचा व व्यक्तिमत्वाचा वेध घेताना त्‍यांचे कार्य आणि कर्तुत्व किती महत्‍वपूर्ण आहे याची जाणीव करून दिली, त्यांचे समस्त जीवनच समर्पण,आणि कर्मयोग यांचा समन्वय असून अखंड कर्तृत्वाचा ज्ञान यज्ञ असल्याचे सांगितले, शिवाय त्‍यांनी सामाजिक, व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य जसे केले त्याचप्रमाणे ,बहुजनहितासाठी त्यांनी दिलेला लढा ,बहुजनांसाठी आरक्षणाची व्यवस्था ,अस्पृश्य निवारणाचे त्यांनी केलेले कार्य देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी कसे उपयुक्त ठरणारे आहे याची जाणीव करून दिली.यावेळी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ अभिवीलास नखाते यांनी केले, यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …