Breaking News

*विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देऊन छत्रपती शाहू महाराजांची 147 वी जयंती साजरी*

*विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देऊन छत्रपती शाहू महाराजांची 147 वी जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अंड हायस्कूल च्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराजांची 147 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक सचिव डॉ. मारोती वाघ ,संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ , संस्थेचे स्थायी सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर ,रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला संस्थेचे सचिव डॉ.मारोती वाघ सर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तर संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध शिष्यवृत्ती योजनांवर प्रा.जनबादे , प्रा. नागपुरे डॉ जांभुळकर ,दुर्गा बुरंगे मॅडम ,सुषमा वडस्कर ,प्रा. जवंजाळ ,विशाल कोठेकर सर उपस्थित शिक्षकांनी विचार मांडले. विद्यार्थ्यांपर्यंत या सर्व योजनांचा लाभ पोहोचविण्याचा मानस असल्याचे सर्व शिक्षकांनी सांगितले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ. लता वाघ यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज कल्याण तर्फे सरकारमान्य शिष्यवृत्ती ची माहिती शिक्षकांनी संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यास आजपासून सुरुवात करावी व शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना ,कोरोना काळात हातचा रोजगार गेलेल्या पालकांना शिष्यवृत्तीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्यास सुरुवात करण्याचा आजचा शुभ दिवस असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थापक सचिव डॉ मारोती वाघ सर यांनी शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते राजश्री शाहू महाराज यांच्या पासून आपण शैक्षणिक चळवळ सुरू करावे व प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे हे क्षेत्रीय भेट देऊन समजून सांगावे असे शिक्षकांनाआव्हान केले. जून महिना भर राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांच्या मार्गदर्शनात गरजूना sanitizer व मास्क चे वाटप करून शैक्षणिक महत्त्व समजून सांगितले या सामाजिक कार्यात सर्व शिक्षकांनी हिरहिरीने सहभाग घेतला असेच सहभाग घेत राहावे असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन किशोरी काकडे मॅडम व आभार सुशमा वडस्कर मॅडम यांनी केले.कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला कार्यक्रमाला 20 टक्के शिक्षक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …