*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन*

*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन*

नागपुर प्रतिनिधि – पवन किरपाने

नागपुर – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. आंदोलकांना मार्गदर्श करताना फडणवीस यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरून मोठी घोषणा केली. ‘माझ्या हाती सत्तेची सूत्रे आली तर चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देईन आणि देता आले नाही तर राजकीय संन्यास घेईन,’ असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘स्वत:च्या अपयशाचं आणि नाकर्तेपणाचं खापर राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. स्वत:ला काही करता येत नाही आणि दुसऱ्याला दोष देतात. उद्या बायकोनं मारलं तरी हे मोदींवर आरोप करतील,’ असा टोला फडणवीस यांनी मारवा.
वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका केली होती, असा आरोप फडणवीसांनी केला .ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ‘ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळलं पाहिजे. सरकारच्या वतीनं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे न्यायालयात लढले, असं ते म्हणाले.


‘ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं काम ७० वर्षांनंतर मोदी सरकारनं केलं. काँग्रेसनं किंवा राष्ट्रवादीनं हे काम केलेलं नाही. ओबीसींसाठी वेगळं खातं मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलं. वेगळी आर्थिक तरतूद केली,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

‘राज्यातील आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांना अजिबात महत्त्व नाही. एखाद्या ताटात चटणी, कोशींबीर, लोणचे असते, तितकंच महत्त्व यांना आहे. ते खासगीत काय बोलतात हे तुम्हाला सांगू शकत नाही. पण राजकीय नाईलाजामुळं त्यांच्या राजकीय मालकांनी सांगितलं तितकंच ते करतात, असं फडणवीस म्हणाले. ‘फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत, ८५ टक्के महाराष्ट्र निवडणुकीला सामोरा जाणार आहे, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही. ओबीसींना वंचित ठेवायचं असं हे कारस्थान आहे. ते कारस्थान उधळून लावण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. ओबीसींना राजकीय मिळत नाही तोपर्यंत भाजपचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. ही आरपारची लढाई आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …