*काँग्रेसचे ओबीसी आरक्षण बहाल करण्यासाठी धरणे आंदोलन*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड :ओबीसीना आरक्षण बहाल करण्याची मागणी घेवून आज दि 26 ला काँग्रेस व भाजपाच्या वतीने चक्का जाम व धरणे आंदोलन करून ओबीसीना आरक्षण मिळे पर्यंत राज्यातील जि प व प स पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांच बरोबर ओबीसीना विविध समस्यांचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधा मिळणार नाही. म्हणजेच ओबीसी समुदाय आर्थिक,सामाजिक विकास पासुन वंचित राहील असे मनोगतही व्यक्त केले.
काँग्रेसच्या वतीने तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस कमिटी व मोवाड शहर काँग्रेस कमेटीने स्थानिय गांधी चौक येथे तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे याच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून ओबीसी आरक्षणाबाबत केद्र शासनाच्या ध्येय धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हेतू परस्पर केद्र शासन ओबीसीना आरक्षण देऊ ईच्छीत नसल्यामुळे केद्र शासनाने कोर्टात ओबीसी आरक्षणा संदर्भात योग्य ते पाऊल उचलले नसल्याचा आरोप सुदर्शन नवघरे यानी केला. या प्रसंगी केद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कोरडे, मोवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर साठवणे, योगेंद्र बहादुरे, सुनिल बालपांडे, शंकर फुले, . दिगांबर बालपांडे, सुरेश राऊत, गुलाम अली, दिपक चौव्हान, कादीर भाई , यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
.
Maharashtra News Media सच की आवाज