*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे राजश्री छत्रपती शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा:- औष्णिक विघुत केंद्र येथे राजश्री शाहू महाराजांची १४७ वी शनिवार, दिनांक 26/06/2021 रोजी सकाळी 10:00 वाजता प्रशासकीय इमारत येथील सौदामिनी सभागृह येथे राजश्री छत्रपती शाहु महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी खापरखेडा औष्णिक विघुत केद्रांचे मुख्य अभियंता राजू घुगे, नितिन काळे, सहा.महाव्यवस्थापक मा.सं,
भारती सोळंके, कार्यकारी अभियंता MPD.
विनोद बराटे, अति.कार्यकारी अभियंता CPS.
अमरजीत गोडबोले, कल्याण अधिकारी, प्रभारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु घुगे यांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता राजु घुगे यांनी राजश्री शाहू महाराज यांचा जीवनावर प्रकाश टाकत म्हणाले कि, त्याकाळात बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होते, राजकीय निर्णयप्रक्रियेत बहुजनांना कोणतेही स्थान नव्हते म्हनूण बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावुन घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन असोसियेशनची स्थापना केली व बहुजनांच्या हितसंबंधाना वाचा फोडली. डॉ.आंबेडकराच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशात पाठविले.

अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. आतंरजातीय विवाहाला मान्यता देणारा पुनर्विवाह कायदा करण्यास ब्रिटिशांना भाग पाडले. जातीभेदाला विरोध केला. मूकनायक या वर्तमानपत्रातून समताधिष्टित समाज आणि धर्मनिरपेक्षता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले. अशा महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आज संपुर्ण राज्यात “सामाजिक न्याय दिवस”म्हनूण साजरा केला जातो. म्हनूण त्यांच्या विचांराची आज देशाला तसेच जगाला गरज आहे. असे ते बाेलत होते. यांसमवेत अधिकारी/अभियंते व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज