*सावनेर मधे मतदाता जनजागृती रैली*

*मतदाता जनजागृती रैली*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले (सावनेर)*

*निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसिलदार दिपक करांडे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुण रैलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.*


*सावनेर येथे होऊ घातलेल्या सावनेर ४९ विधानसभा निवडणूकी दरम्यान 100 टक्के मतदान करण्यास मतदात्यांना प्रोत्साहीत करणे व कोणत्याही प्रलोभनाला व बळजबरीला बळी न पडता स्वतंत्र व स्वच्छ वातावरणात मतदान केंद्रावर पोहचून मतदात्यांनी मतदान करावे या करिता सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसिलदार दिपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदाता जनजागृती रैलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते सदर आयोजनात भालेराव हायस्कुल,नगर परिषद हायस्कुल,जवाहर कन्या वीद्यालय,माँर्नींग स्टार काँनव्हेंट व ज्यूनीयर विद्यालय,भालेराव ज्यूनीयर विद्यालय आदींचे एनसीसी कँडेट्स,एनएसएस कँडेट्स,विद्यार्थी विद्यार्थींनी,शिक्षकवृंद,तहसील कार्यालय व नगर पालीका सावनेर चे अधिकारी कर्मचारीवृदांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या मतदाता जनजागृती रैलीला हिरवी झंडी दाखवून सुरुवात करण्यात आली*


*याप्रसंगी सर्व विद्यार्थी मतदान जनजागृती चे फलक हातात घेऊन मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आपण पुर्ण केलेच पाहीजे अशा घोषणा करत गांधी पुतळा,गडकरी चौक,बाजार चौक,होळी चौक,बस स्थानक असे भ्रमण करुन नगरीत मतदानाचे महत्व विशद करून मतदात्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य,लोक जागर,मतदान जनजागृती संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.*


*मतदान जनजागृती रैलीच्या मार्गावर अडथळा होऊ नये करिता सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अधिकारी कर्मचारी यांनी रैलीचा मार्ग सुकर करण्यास परिश्रम घेतले*


*या प्रसंगी नायब तहसीलदार सौ.योगीता दराडे,भाकरे गशिअ.,सुनिल शेंन्डे प्रामुख्याने उपस्थित होते.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …