Breaking News

*कामठी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करण्याची मागणी* *भाजपा पदाधिकार्यांचे आ. गिरीस व्यास यांना निवेदन*

*कामठी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करण्याची मागणी*

*भाजपा पदाधिकार्यांचे आ. गिरीस व्यास यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी शहरात व परिसरात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन आरोग्य विभागा कडुन तिसऱ्या लाटेचा इशारा देत असल्याने व तिसरी लाटेच्या सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता ही आरोग्य विभागाडुन वर्तविण्यात येत असल्याने भाजपा कामठी शहर च्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात विधान परिषद सदस्य आ. गिरीश व्यास यांना एक निवेदन देऊन तात्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे .
राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात व शहरात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन आरोग्य विभागा कडुन तिसऱ्या लाटेचा इशारा देत असल्याने व तिसरी लाटेच्या सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता ही आरोग्य विभागाडुन वर्तविण्यात येत असल्याने कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे पर्याय सोई सुविधा पुरविण्यात यावा आयसीयु कक्ष बनविण्यात यावे . बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांना मेयो , मेडिकल , डागा रुग्णालयात रेफर करणे बंद करावे . अशी मागणी भाजपा कामठी शहर पदाधिकार्यांनी अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात विधान परिषद सदस्य आ गिरीश व्यास यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे . या प्रसंगी भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया , नप विपक्ष नेता लालसिंग यादव , महामंत्री उज्वल रायबोले , राजकुमार हातोडी , विनोद संगेवार , नगरसेवक प्रतिक पडोळे , राजु पोलकमवार , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते . निवेदनाची प्रतिलिपि केंन्द्रीय मंत्री श्री नितिन गडकरी , माजी पाकलमंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे , आमदार श्री टेकचंद सावरकर यांना देखील देण्यात आले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …