Breaking News

*टेकाडी ग्रामपंचाय व आरोग्य उपकेंन्द्रा व्दारे शिबीरात २५३ नागरिकांचे लसीकरण* *१८ वर्षं वरील २३७ युवकांचे लसीकरण*

*टेकाडी ग्रामपंचाय व आरोग्य उपकेंन्द्रा व्दारे शिबीरात २५३ नागरिकांचे लसीकरण*

*१८ वर्षं वरील २३७ युवकांचे लसीकरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – टेकाडी ग्राम पंचायत अंतर्गत आरोग्य उपकेंन्द्र टेकाडी येथे कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर आयोजित करून २५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.


टेकाडी ग्राम पंचायत व्दारे अंतर्गत नागरी लोक वस्तीत जनजागृती करण्यात आली . सदर जनजागृती परिणाम म्हणुन या लसीकरणात युवा वर्गाने मोठया प्रमाणात सहभाग घेतला. यात १८ वर्षं वरील युवकांनी २३७ तर ४५ वर्षावरील १६ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. असे एकुण २५३ नागरिकांनी लस घेऊन लसीकरण शिबीराचा लाभ घेतला. हया लसीकरण शिबीराच्या यशस्विते करिता टेकाडी ग्राम पंचायत सरपंचा सुनीता मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य अरूण सुर्यवंशी, डॉ. स्वाती घोडेश्वर, आरोग्य सेविका अर्चना बागडे, आरोग्य सेवक कृष्णा मेश्राम, आशा सेविका छाया रहांगडाले, पंचायत सेवक मनोज मोहाडे, विलास सावरकर, सुधाकर वासाडे, कुंदन शेंडे, सुनीता वानखेडे आदि ने सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …