Breaking News

*आदर्श हायस्कुल कन्हान व्दारे वृक्षरोपन*

*आदर्श हायस्कुल कन्हान व्दारे वृक्षरोपन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोव्हिड- १९ प्रादुर्भाव लक्षात घेत शैक्षणिक सत्र २०२१-२२ सुरू करण्यात आले असल्याने आदर्श हायस्कुल कन्हान येथील शाळेच्या पटागंणात संचालन मंडळाच्या अध्यक्षा व सचिव हयांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.


आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान व्दारे संचालित आदर्श हायस्कुल (हिंदी माध्यम) कन्हान व्दारे शैक्षणिक सत्र २०२१-२२ हे कोव्हीड- १९ प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यार्थी विना सुरू झाले असल्याने सत्राच्या दुसऱ्याच दिवसी मंगळवार (दि.२९) जुन ला सकाळी ११ वाजता पत्रकार मंडळी सोबत चर्चा करून शाळेच्या पटागंणात पिपळाच्या वृक्षाचे संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा व्दिवेदी, सचिव भरत सावळे, जेष्ट पत्रकार एन एस मालविये, मुख्याध्यापिका शुभदा मसाळकर आदिं च्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान चे मोतीराम रहाटे, कमलसिंग यादव, सुनिल सरोदे, रविंद्र कोचे, रविंद्र दुपारे, ऋृषभ बावनकर, रोहित मानवटकर आदि प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आदर्श हायस्कुल कन्हानच्या मुख्याध्यापिका शुभदा मसाळकर, शिक्षिका, चंद्रकला मेश्राम, प्रिती बोपचे, छाया मिसार, रेणुका वर्मा, अनिता हारगुडे, सुरेश वंजारी, जगदिश दुबे, अरविंद नेवारे सह कर्मचार्यांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …