*आॅन लाईन शिक्षणपध्दती कायम स्वरूप नसावी ; कष्टकरी पालकवर्गात नाराजी* *शासनानेच गरीब विद्यार्थ्यांना साठी निशुल्क मोबाईल वाटप योजना हाती घेवीत*

*आॅन लाईन शिक्षणपध्दती कायम स्वरूप नसावी ; कष्टकरी पालकवर्गात नाराजी*

*शासनानेच गरीब विद्यार्थ्यांना साठी निशुल्क मोबाईल वाटप योजना हाती घेवीत*

नरखेड तालुका प्रतिनीधी – श्रीकांत मालधुरे

 

नरखेड़ – नुकतेच वर्ग पहीली ते नववी पर्यंतचे शालेय शिक्षण हे कोरोना माहामारीमुळे
शालेय शिक्षण विभागाने आॅन लाइन पध्दतिने घेण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे गावखेड्यातील रोज मजुरीने कामावर जाऊन परीवाराच भरणपोषन करणार्‍या कष्टकरी कामगार वर्गासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे निदर्शनात येत आहे. मुखत्वे स्वत: अशिक्षीत
राहुन लेकरांना शिक्षण देणार्‍या पालकवर्गात मोठा गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसत
आहे. ” आन लाइन शाळा म्हनजे काय गा भौ” ” थे कशी काय आहे ” हे आज अत्यंत लहाण खेडेगावातील वास्तव पाहायला मिळत आहे, त्यामुळे शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल पालक वर्गात याविषयी मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
मोठी शहरे वगळता ग्रामीण भागातील व अती मागासभागाचा विचार करता शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार करावा असे तज्ञ जानकारांचे मत आहे.
दोनशे रूपये रोज, दहा हजाराचा मोबाईल, पाचशे रूपयाचे मासीक रिचार्ज त्यात आॅनलाईन शाळेचा ड्रेस घालुन मोबाइलसमोर
आॅन लाईन अभ्यासीका घेणे हे गाव खेड्यातील कष्टकरी व कामगार वर्गाला परवडण्यासारखे नसल्याचे सध्या ग्रामीणचे चित्र दीसुन येत आहे. सतत दोन वर्षापासुन कोरोना लाॅकडाऊनमुळे गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. महागाइचा डोंगर व परीवाराच्या ऊदर निर्वाहाच्या ओझाखाली पालकवर्ग पार
दबलेला आहे. मुलांच्या शिक्षणाची ही घडी व त्यांचे कसेबसे ऊदर भरण डोक्यावर थकलेले मासीक इलेट्र्कीक बिल दवाखाण्याचा खर्च, कीराणा, भाजीपाला खरेदी या साप्ताहिक खर्चातच त्याचे व्यवस्थापन चालत असते. लहाण मुलांच्या शिक्षणासंदर्भात शासनाने वेळोवेळी या दोनवर्षात अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतले आहे. त्यात वेळोवेळी महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहे. विषयाचे सिलैबस कोणते हेही धडत्या विद्यार्थ्यांना माहीती नाही.. मी आता कोणत्या वर्गात गेलो व माझे नाव कोणत्या शाळेत टाकले हे ही त्या चिमुकल्याला माहीती नसते. अशावेळी खेड्यातील पालकासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. पप्पा शाळा केंव्हा सुरू होइल, आम्हाला घरी करमत नाही” अशी केवीलवाणी मागणी लहाण
मुले घालायला लागली आहे. दोन वर्षापासुन त्यांचे शालेय समीकरणच बिघडले असल्याने गरीब, कामगार, मुखत्वे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी निदान चार दिवस तरी
आॅफ लाईन शाळेची व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी मोवाड, गोधणी गायमुख, पांढरी, खैरगाव, देवग्राम, माणिकवाडा, बेलोना, अदिवासीबहुल भायवाडी, गंगालडोह , पिलापुरसह तालुक्यातील असंख्य गावातील
नागरीकांनी केली आहे.

प्रतिक्रिया ;

१) आॅन लाइन शिक्षण हे गरीबाच्या विद्यार्थ्यासाठी परवडण्यासारखे नाही.तसेच विद्यार्थी चा शारीरिक विकास होत नाही. मोबाईलच्या आतिवा पराणे भविष्यात डोळाची समस्या निर्माण होऊ शकते

अंकुश घावडे भाजप युवा शहराध्यक्ष मोवाड

२) आॅन लाईन शिक्षण पध्दतीचे स्वागत आहे.कोरोना महामारी लक्षात घेता शासनाने घेतलेला निर्णय नक्कीच चांगला व विद्यार्थी हिताचा आहे. परंतु या निर्णय मुळे मुलांना मोबाईल वापराचे व्यसन लागु शकते व ज्याप्रमाणे आधि शिक्षण हे कळत होते असे समजणे कठीण जाते.

राहुल होले नागरिक मोवाड

३) आॅन लाईन शिक्षणपध्दती म्हणजे मोबाईलवर आरामात अभ्यास, शासनाचा हा निर्णय योग्य असला तरीही काही भागात नेटवर्क नसलेमुळे समस्या निर्माण होते.ग्रामीण भागातील विद्यार्थी याची आथिर्क परिस्थिती ही नाजूक असते. त्याकरीता शासनानेच गरीबाच्या विद्यार्थ्यासाठी व त्याच्या शिक्षणासाठी आर्थीक मदतीची तरतुद करणे गरजेचे आहे.

मंगेश हिवरकर विद्यार्थी पालक

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …