*ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना व महीला काँग्रेस हिंगणघाट तहसील कार्यालय हिंगणघाट समोर दिला धरणा आंदोलन* *दिनांक 5 जुलै 2021 सोमवार ला ठीक 12 वाजता तहसील कार्यालयावर धरणा आंदोलन दिला*

*ज्येष्ठ नागरिक निराधार संघटना व महीला काँग्रेस हिंगणघाट तहसील कार्यालय हिंगणघाट समोर दिला धरणा आंदोलन*

*दिनांक 5 जुलै 2021 सोमवार ला ठीक 12 वाजता तहसील कार्यालयावर धरणा आंदोलन दिला*

वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

वर्धा – सौ मंगला ताई ठक महीला काँग्रेस तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज धारणा आंदोलन करण्यात आले. पेट्रोल , डीझल , खायचे तेल , गॅस सिलेंडर दर वाढीचा विरोधात केंद्र सरकारचा निषेध दर्शवण्यात आला.

तसेच निराधांच्या अनेक मागण्या सह निरधांची उत्पन्न मर्यादा 21000 वरून 50000 वाढविणे , निराधारांचे मानधन 3000 रू करणे, 50 वर्ष वरील शेतकऱ्याला व त्याच्या पत्नीला 3000 रू मानधन देण्यात यावे , ड क्रमांक यादीतील ओबीसी ला घरकुल योजनेचा लाभ विशेष निधीतून देण्यात यावा तसेच GR नुसार आधार कार्ड व डॉक्टर सर्टिफिकेट श्रावण बाळ निराधार योजनेसाठी वयाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. कारण पूर्वी रस्त्यावर डिलिव्हरी होत होती, व जन्माची नोंद फार कमी लोकांची व्हायची , महिलांना शिक्षणा पासून वंचित ठेवायचे त्यामुळे त्यांना TC किंवा जन्म दाखले नसल्या मुळे निराधारांना वंचित ठेवू नये तसेच निराधार व्यक्तीचे मुलांचे टीसी मागवून त्या नुसार आई वडील ची वय ग्राह्य धरल्या जावू नये पूर्वी मुल सुध्दा लग्ना नंतर 15 , 20 वर्षा नंतर व्हायचे त्यामुळे मुलांच्या टीसी वरून त्यांच्या आई वडिलांची योग्य वय काढता येणार नाही , बरेच ग्राह्य प्रकरण याच मुळे नामंजूर केल्या गेले या वर योग्य तोडगा काढावा किंवा ज्या प्रमाणे आजपर्यंत केसेस मंजूर होत होत्या त्याच आधारावर केसेस मंजूर कराव्या .

12 महिन्या त सहाच महिन्याचे निरधांचे पगार मिळाले मग सहा महिन्याचे पगार कुठे गेले व का आले नाही निराधारांना त्यांचे संपूर्ण 12 महिन्याचे पगार देण्यात यावे . यासाठी
धरणे आंदोलन देण्यात आले.
मोठ्या संख्येनं लाभारत्यानी या धरणे आंदोलनात सहभागी घेतला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …