Breaking News

*रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 1 जागेसाठी 9 व पंचायत समितीच्या 3 जागांसाठी 16 नामांकनपत्र दाखल*

*रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 1 जागेसाठी 9 व पंचायत समितीच्या 3 जागांसाठी 16 नामांकनपत्र दाखल*

विशेष प्रतिनिधि
रामटेक – रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोथीया-पालोरा या एका व पंचायत समितीच्या उमरी,मनसर व नगरधन या तीन जागांसाठी अनुक्रमे 9 व 16 उमेदवारांनी आपले नामांकन पत्र तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रामटेक यांचे कार्यालयात दाखल केले आहेत.

उपरोक्त जिल्हा परिषद /पंचायत समिती साठी पोटनिवडणूक दि.19जुलै2021रोजी संपन्न होत आहे. नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 05 जुलै 2021 रोजी पर्यंत विविध 25 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे. बोथीया-पालोरा जिल्हा परिषद गटासाठी श्रावण रेखाराम बोरकर(अपक्ष),सुशील सोहन ऊईके (अपक्ष), हरिचंद्र गुलाब उईके( गोंडवाना गणतंत्र पार्टी), कैलास यशवंत राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), देवानंद रमेश वंजारी( शिवसेना) लक्ष्मण उमराव केने (भारतीय जनता पार्टी) महादेव रत्तू वरठी (अपक्ष) नकुल काशीराम बरबटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)व नम्रसेन भीमराव डोंगरे ( बहुजन वंचित आघाडी)या 9 उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केली आहेत. पंचायत समितीच्या उमरी गणातून रामकृष्ण वरखडे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), रमेश नंदराम बमनोटे( शिवसेना) महेश कुमार दशरथ मडावी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) सुखदेव काशीराम शेंद्रे (भारतीय जनता पार्टी), संदीप मोतीलाल इनवाते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व भुमेश्वरी विश्वनाथ कुंभलकर (भारतीय जनता पार्टी) यांनी नामांकन पत्र दाखल केली आहेत. मनसर प.स. गणातून अर्चना संदीप पेटकर( भारतीय जनता पार्टी), कला उमेश ठाकरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) व स्वरुपा किरण चौधरी (शिवसेना) यांनी नामांकन पत्र दाखल केले आहे. नगरधन या प.स.गणातून शोभा देविदास सरोदे (प्रहार जनशक्ती पार्टी) मालती रामदास बावनकुळे( शिवसेना),कांचनलता नरेंद्र बंधाटे(भारतीय जनतापार्टी), कविता सुभाष बावनकुळे (भारतीय जनता पार्टी) स्वाती आनंद रामेलवार (अपक्ष) व अश्विता मुन्‍नीलाल बिरणवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …