Breaking News

*आदिवासी बहूल स्लम वस्ती मध्ये कोविड-१९ मुळे आलेली बिकट परिस्थिती मध्ये जेष्ठ नागरिकांना धान्य किट वाटप*

*आदिवासी बहूल स्लम वस्ती मध्ये कोविड-१९ मुळे आलेली बिकट परिस्थिती मध्ये जेष्ठ नागरिकांना धान्य किट वाटप*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- दिनांक ३ जुलै २०२१ रोजी समाज भवन, अंबाझरी टेकडी, नागपूर या आदिवासी बहुल स्लम वस्ती मध्ये कोविड_१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला यासाठी हेल्पेज इंडिया तर्फे धान्य किट ज्यामध्ये ५ किलो आटा,५ किलो तांदूळ,२ लिटर गोडे तेल,२ किलो साखर,१किलो तुर डाळ,मीठ, मिरची पावडर,हळद मसाले,आंघोळीच्या साबण,कपडे धुण्याच्या साबण, फिनाईल इत्यादी चा समावेश असलेल्या किट चे गरजू ज्येष्ठ नागरिक यांना वितरण करण्यात आले,याप्रसंगी श्री.सुनील जी ठाकूर,सिनियर मेनेजर हेल्पेज इंडिया,नागपूर, हेमंत दानव, सिनियर एक्झिक्युटिव्ह, हेल्पेज इंडिया, विरेंद्र फुंडे, दिनेश शेराम, सिनेट मेंबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग पदाधिकारी विजय परतेकी,राहुल मडावी, स्वप्नील मसराम प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना दिनेश शेराम म्हणाले की, “कोविड_१९ मुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले,अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागला यात ज्येष्ठ नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागला मात्र ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सातत्याने आरोग्य सेवा सह अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे हेल्पेज इंडिया यांनी सामाजिक दायित्व निभावत आज स्लम भागातील ज्येष्ठ नागरिक यांना धान्याची किट वितरित केली,त्यामुळे ज्येष्ठांना निश्चितच दिलासा मिळेल,हेल्पेज इंडियाच्या कार्याला शुभेच्छा व त्यांच्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो.”

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …