Breaking News

*रामकृष्ण वाघ मुक्त विद्यापीठ केंद्राने शिक्षणापासून वंचित मुलांना भेट देऊन आगळ्या पद्धतीने विद्यापीठ वर्धापन दिन साजरा*

*रामकृष्ण वाघ मुक्त विद्यापीठ केंद्राने शिक्षणापासून वंचित मुलांना भेट देऊन आगळ्या पद्धतीने विद्यापीठ वर्धापन दिन साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले

नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक , नागपूर विभागाद्वारे विद्यापीठ स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संचालिका केंद्रप्रमुख सौ लता वाघ होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे स्थायी सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलित करून विद्यापीठाच्या प्रांगणात केंदप्रमुख सौ लता वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केंद्रप्रमुख सौ लता वाघ यांनी शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फार मोठा वारसा देणारे व आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या विधी मंडळाने1जुलै 1989 रोजी विशेष कायदा क्रमांक 20 अन्वये स्थापना केलेल्या विद्यापीठाला देऊन गौरविण्यात आले अशा लोक विद्यापीठाचा आपण एक भाग आहोत हे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच या विद्यापीठात रोजगाराभिमुख , व्यवसायिक जीवनोपयोगी शिक्षणक्रम, दूरशिक्षण पद्धतीने दिल्या जाते. आज आपण कोरोना काळातही या दूर शिक्षणाचा आधुनिक पद्धतीने उपयोग करीत आहोत ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव शिक्षण सोडलेले आहे त्यांना आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून देता यावा म्हणून ग्रामीण क्षेत्रीय भेट देऊन त्यांना sanitizer व मास्क चे वाटप केले .शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क देण्याचा मानस असल्याचे सांगितले .शिक्षनाच्या माध्यमातून भारताचा विकास घडवून आणण्याचे आव्हान अध्यक्षीय भाषणात केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.सुवर्णा जांभूळकर ,लीला वाघ मॅडम, सुहासिनी कामठे मॅडम ,प्रा.दीक्षा जनबादे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला 20 टक्के समंत्रक उपस्थित होते कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …