Breaking News

*साक्षी बिस्किट कंम्पनीतील कंञांटी कामगारांच्या अनेक प्रलबिंत मागण्या मंजुर* *नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या प्रयत्नाला यश* *भारतीय जनता कामगार महासंघाचा कोराडी-महादुला येथे जयघोष*

*साक्षी बिस्किट कंम्पनीतील कंञांटी कामगारांच्या अनेक प्रलबिंत मागण्या मंजुर*

*नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या प्रयत्नाला यश*

*भारतीय जनता कामगार महासंघाचा कोराडी-महादुला येथे जयघोष*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- साक्षी बिस्किट कंम्पनीत अनेक वर्षा पासून कंञाटी पध्दतीवर परप्रांतीय मंजुर कंञाटी कामगार म्हणून कार्यरत होते. साक्षी बिस्किट कंम्पनीतील व्यवस्थापन त्याच्यावर अनेक वर्षापासून अत्याचार करत होते तेथील कामगारांनी भारतीय जनता कामगार महासंघा मार्फत आवाज उठवला असता त्यांच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपुर राजदीप धुर्वे यांना दिनांक २१/०६/२१ ला पञ प्राप्त झाले असून त्यांनी दिनांक ३०/०६/२१ ला भारतीय जनता कामगार संघटनेच्या पदाधिका-यांना त्यांच्या दालनात नागपुर येथे बोलावून घेऊन साक्षी बिस्किट कंपनीला सुध्दा बैठकीत बोलावून नियमाचे उलंघन का केले असे खडे बोल सुनावले असता तात्काळ प्रलंबीत असलेल्या मागण्या निकाली लावल्या. कामगाराच्या मागण्या कामगार संघपाल कोलते यांच्या मृत्यु झाला असता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला ऑफिस मधे कामावर घेण्यात येणार.
कामाचे वेळ १२ तास ऐवजी ८ तास करण्यात येणार.
कामगारांना परिमंडळ २ चा पगार मंजूर करण्यात आला.
कामगार आयुक्त कार्यालय नागपूर येथे असिस्टंट लेबर कमिश्नर राजदीप धुर्वे, साक्षी बिस्कीट कंपनी व्यवस्थापन, राजेश रंगारी यांच्या बैठकीत कामगारांना न्याय मिळाला म्हणून
साक्षी बिस्कीट कंपनीतील कामगारायांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याबद्दल कामगारांनी आतिषबाजी, बैंड वाजवून राजेश रंगारी नगर अध्यक्ष न. पं. महादुला, नरेंद्र धानुले, आशिष राऊत,
राहुल नागदेवे अध्यक्ष भारतीय जनता कामगार महासंघ महाराष्ट्र संघटना पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले . याप्रसंगी
सागर प्रधान, प्रतीक रंगारी, विश्वनाथ चव्हाण, अंजित गेडाम, नितीन मनवर, राहुल इंगोले, दिलीप सुधीर, राजकुमार गजभिये, राहुल खोब्रागडे, अनिल संतापे, मिथुन मोहणकर, प्रफुल संजय तांडेकर आणि आदी कामगार उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …