*गड्यात फसुन कुत्र्याच्या चावडीत सापडेल्या घायाळ हरिणास जिवनदान दिले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – गड्यात फसलेल्या हरिण पाहुन कुत्र्यानी हमला बोलुन घायल हरिणाच्या आवाज ऐकुन सृज्ञ नागरिकांनी मदतीला धावुन हरिणाचे प्राण वाचवुन पोलीस च्या मदतीने रेसक्यु पथकाच्या स्वाधिन करून जिवनदान दिले.
कांन्द्री वार्ड क्रमांक ५, बेलसरे लेआऊट मध्ये पहाटे एक भटकलेला हरिण अशोक मेश्राम यांच्या घरा सामोरील एक निर्माणधीन घराच्या कॉलम करिता खोदलेला गड्डयात पडुन फसल्याने हरिणावर कुत्र्यांनी हमला करून हरिणाला घायल केल्याने तो ओरडत असल्याचा आवाज ऐकुण कांन्द्री ग्रामपंचायत चे सरपंच बलवंत पडोळे, महेन्द्र भुरे, योगेश वाडीभस्मे, बैशाकु जनबंधु, मनोज मधुमटके, लंकेश मेथीया, संदिप खरे, रोशन नारकर, दिनेश मेथीया, सुभाष मेश्राम, अजय चन्ने, मोरेश्वर वंजारी आदि ने मदतीला धावुन हरिणाचा जिव वाचविला. घायल हरिणाला गड्डया बाहेर काढुन त्यास पाणी पाजुन कन्हान पोलीस स्टेशन व आरएफओ सुचना दिली. यामुळे कन्हान पोलीस स्टेेशन चे अपीआई अमित कुमार आत्राम, पोलिस सिपाई बंटी गेडाम तुरंत घटनास्थळी पोहचुन घायाल हरिणाला ताब्यात घेऊन गोरेवाडा नागपुर येथुन आलेल्या रेसक्यु पथकाच्या स्वाधिन करून हरिणाला जिवनदान दिले.
Maharashtra News Media सच की आवाज