*कन्हान पोलीसांनी ओमिनी गाडीत ०४ गोवंश बैल कोबुन भरून नेतांना पकडुन जनावरांना दिले जिवनदान*

*कन्हान पोलीसांची कारवाई , एका आरोपीस पकडुन १,६८,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी चौक येथे गोपनीय बातमी वरून कन्हान पोलीसांनी नाकाबंदी करीत असतांना एक ओमिनी चारचाकी गाडीला नाकाबंदी च्या ठिकाणी थांबवुन वाहनाची तपासणी केली असता ओमिनी गाडी मध्ये ०४ गोवंश बैल अत्यंत क्रुरपणे व निर्दयतेने कोंबुन आखुड दोरखडाने बांधुन कामठी येथे कत्तली करीता घेवुन जातांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.०४) जुलै २०२१ ला रात्री १०:१५ ते ११:१५ वाजता दरम्यान गोपनीय बातमी वरून कन्हान पोलीसांनी गांधी चौक येथे नाकाबंदी करीत असतांना यातील ओमिनी गाडी क्र. एम एच ३१-एजी – ०११७ ला नाकाबंदीच्या ठीकाणी थांबवुन वाहनाची तपासणी केली असता ओमिनी चारचाकी गाडी मध्ये ०१ बछडा, ०१ गोरा, ०२ गाय असे एकुण ०४ गोवंशाला अत्यंत क्रुरपणे व निर्दयतेने कोंबुन आखुड दोरखडाने बांधुन आरोपी १) निलेश अशोकराव निस्वादे राहणार नागसेन नगर कामठी हा अवैद्य वाहतुक करित कामठी येथे कत्तली करीता चारचाकी ओमिनी वाहनात भरून घेवुन जात असतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातुन ०१ बछडा, ०१ गोरा, ०२ गाय असे एकुण ०४ गोवंश किंमत ४८,००० रुपये , ओमिनी गाडी क्र. एम एच ३१-एजी – ०११७ किंमत अंदाजे १,२०,००० रुपये असा एकुण १,६८,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करित ताब्यात घेण्यात आला आणि चारही गोवंश जनावरांना गोवंश गौशाला गौविज्ञान अणुसधान केंन्द्र देवलापार येथे जमा करून सरकार तर्फे फिर्यादी संजय भदोरिया पोस्टे कन्हान यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(अ) (ड) (इ) (एफ) (आय), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ ५ (अ), ९, मोटार वाहन अधिनिय १९८८ , १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. . सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पुढील तपास संजय भदोरिया हे करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज