*निशीखा हेमंत गोखे हीची स्पोर्ट इंडियात निवड*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
नागपुर : – स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत खेलो इंडिया खेलो मध्ये चौदा ते सोळा वयोगटात बैडमिंटन स्पर्धे करिता कु.निशीखा हेमंत गोखे ही ची निवड करण्यात आली आहे.
स्पोर्ट इंडिया उपक्रमा अंतर्गत दि.९ फेबुवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ ला युनिवर्सिटी ग्राउंड नागपुर येथे स्पर्धा चाचणी आयोजित करण्यात आली होती. खेलो इंडिया खेलो मध्ये कु.निशीखा हेमंत गोखे हीची चौदा ते सोळा वयोगटात बैडमिंटन स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे. डी.डी. नगर शाळेचा माजी विद्यार्थी यांनी कु निशीखा गोखे यांच्या घरी जाऊन निवड झाल्या बद्दल कु.निशिखा हीला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून भविष्याच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल सरोते, जगदीश ठवरे, विशाल मानापूरे, निलेश आंबीलवादे, अभय दुरटकर व सुनिल पराते उपस्थित होते. निशीखा गोखे हीने यांचे श्रेय आपल्या आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकाला दिले. आणि प्रोत्साहित केल्याबद्दल सर्वाचे आभार व्यकत केले.