Breaking News

*सौ मंगला कारमोरे यांची भाजपा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ति* *भाजपा पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन केले अभिनंदन*

*सौ मंगला कारमोरे यांची भाजपा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ति*

 

*भाजपा पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन केले अभिनंदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत सरपंच सौ मंगला कारेमोरे यांची कामठी तालुका ग्रामीण भाजपा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ति झाली आहे . सौ मंगला कारेमोरे ह्या येरखेडा ग्रामपंचायत सरपंच असुन आपले कार्य सातत्याने पार पाडत असुन विविध विकासाचे कामे आपल्या कार्यकाळात करीत आहे . केंन्द्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांन पर्यंत पोहचवत असुन नागरिकांच्या समस्या दुर करण्याचे कामे करत आहे . कोरोना काळात आपले जीव धोक्यात घालुन दिवस रात्र नागरिकांन मध्ये जनजागृति करुन नागरिकांना मास्क , सेनिटाइजर , सोशल डिस्टेसिंग , चे पालन करायला सांगत असुन सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आव्हाहन करीत आहे .

हे सर्व कार्य करीत असतांना कामठी तालुक्यात भाजपा जिलहाध्यक्ष श्री अरविंद गजभिए यांनी दौरा केले असता येरखेडा येथे भाजपा पदाधिकार्यांची बैठकी मध्ये येरखेडा ग्रामपंचायत सरपंच सौ मंगला कारेमोरे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची कामठी तालुका ग्रामीण भाजपा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ति करण्यात आल्याने सर्व भाजपा पदाधिकार्यांनी सौ मंगला कारेमोरे यांना पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले . ह्या नियुक्ती मुळे सरपंच सौ मंगला कारेमोरे यांनी सर्व भाजप नेत्यांचे आभार व्यक्त केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …