Breaking News

*२७ दिवसापासून पावसाने फिरवली पाठ* *चला शेताच्या बंधावर व घरासमोर व घरी एक झाड लावुया पावसाला निमंत्रण देऊ या* *नागरिकांना पावसाची व दमट वातावरणाशी सामना करावा लागतो*

*२७ दिवसापासून पावसाने फिरवली पाठ*

*चला शेताच्या बंधावर व घरासमोर व घरी एक झाड लावुया पावसाला निमंत्रण देऊ या*

*नागरिकांना पावसाची व दमट वातावरणाशी सामना करावा लागतो*

नरखेड तालुका प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

मोवाड – परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले होते. परिसरात पेरणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. पण मात्र ९ जून पासून पावसाने पाठफिरवली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. परिसरात कपाशी , तुर , मका , ज्वारी ची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सतत १९०.४ मि.मि पावसाची नोंद मोवाड शहरात झाल्याने पेरणी ला वेग आला होता. पण पाऊस गेल्याने शेतकऱ्यांना वर पहाण्याची वेळ आली आहे.
जर दोन – तिन दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनवर उन्हामुळे निघालेले बियाने मरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोना कहर असतांना दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात येईल. एक तर या वर्षी बि-बियाण्याचे दर वाढल्याने शेतकरी आधीच संकटात आला आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होईल.


पाऊस न येत असल्यामुळे नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण नागरिक आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी व नागरीकांना दर वर्षी एक झाडलावून संगोपन करावे व पावसाला निमंत्रण देऊया व निसर्गाच्या समतोल राखुया.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …