*नदी ओलांडण्याचं धाडस जीवावर बेतला* *दोघे पुरात वाहून गेले* *रेस्क्यू पथकाद्वारे शोध सुरु उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे सह तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी डेरा दाखल*

*नदी ओलांडण्याचं धाडस जीवावर बेतला*

*दोघे पुरात वाहून गेले*

*रेस्क्यू पथकाद्वारे शोध सुरु उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे सह तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी डेरा दाखल*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः दिनांक आठ जुलै 2021 रोजी गुरूवारी कळमेश्वर सह परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पूर आला यातच कळमेश्वर पाटणसावंगी जाणाऱ्या रस्त्यावर आणि कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी नदिवरीवरील रपट्यावर असलेला छोटा पूल ओलांडत असताना नदिला आलेल्या पुरात दोघे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

*अण्णाजी पुरुषोत्तम निंबाळकर वय ५२ ,प्रवीण उर्फ गुडु मधूकरराव शिंदे वय ४२ दोघेही राहणार गोवरी तालुका कळमेश्वर असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत दोघेही शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती असून गोवरी गावावरून काही कामानिमित्त कळमेश्वर ला दुचाकी गाडी क्रमांक एम एच 40 Q1033 ने आल्याची माहिती असून अण्णाजी निंबाळकर यांना दोन मुले तर गुड्डू शिंदे यांना दोन मुली असल्याची माहिती आहे*

*दोघेही शेतकरी असुंन शेती साहित्य खरेदी करण्यासाठी ते कळमेश्वर ला आले असल्याची प्राथमिक माहिती आहे आज सकाळपासूनच कळमेश्वर सह जिल्ह्यातील ईतर तालुक्यातील परिसरात  संततधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते.

*यातच नदीच्या पलीकडे दुचाकी ठेऊन दोघांनीही पाई पुल ओलांडण्याचा बेत आखला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत उतरताच पुराचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले.*

*घटनेची माहिती प्रशासनाला कळताच प्रशासनाकडून शोध कार्य सुरु केले गेले परंतु कळमेश्वर शहरात कळमेश्वर पालिकेकडे उपलब्ध नसलेल्या रेस्क्यू टीमच्या अभावी शोध कार्यात अडचणी निर्माण होत होत्या घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी नदीच्या आजूबाजूला एकच गर्दी केली होती घटनास्थळावर कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नायब तहसीलदार संजय भुजाडे, तलाठी सुरज साजदकर, यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहिस्तोवर आज सुरु केलेल्या शोध अभीयानात एक मु्तदेह रेस्कू टीमला मिळाले असुन दुसस्या मु्तदेहाचा शोध सुरु आहे नाही घटनेची नोंद कळमेश्वर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.*

*तालुक्यातील कळमेश्वर पाटणसावंगी रस्त्यावर गोवरी नदीचा रप्टा म्हणून या नदीवर एक छोटा पूल आहे दर वर्षी या नदीवरील पुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येतो नदीच्या पलीकडे गोवरी खैरी तोंडाखैरी, सिल्लोरी, नेलोरी ,पारडी ,वलनी, खंडाळा आदि गावे आहेत या गावातील विद्यार्थी कळमेश्वर शहरात शिक्षणाकरिता दररोज ये-जा करीत असतात दरवर्षी या पुलावर पावसाळ्यामध्ये मोठा पूर असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जोपर्यंत पुर ओसरत नाही तोपर्यंत नदीकाठावर उभे रहावे लागते गेल्या अनेक वर्षापासून या नदीवर मोठा पूल व्हावा अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूल अजून पर्यंत करण्यात आलेला नाही त्यामुळे आज दोन शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला असल्याची खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली या अगोदरही या नदीवरील पुरातून अनेक जण वाहून गेल्याची घटना घडलेल्या आहेत तेव्हा लवकरात लवकर या नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे*

*प्रशासनाकडून या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …