*धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे कोव्हिड निराश्रित विद्यार्थी दत्तक योजना*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*
कन्हान : – कांन्द्री – कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेत माणुस कीचा परिचय देत कोव्हिड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील निराश्रित बालकांना दत्तक घेण्यात येत आहे.
निराश्रित दत्तक योजनेंतर्गत मंगळवार (दि.६) जुलै ला यश देवेंद्र शेंदरे या विद्यार्थ्यांला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देऊन शाळे तर्फे दत्तक घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांला प्राथमिक चे पुर्ण शिक्षण, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती योजनेचा लाभ व इतर बाबीत शाळेकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे या मोहिमेचे प्रमुख श्री भिमराव शिंदे मेश्राम यांनी सांगितले. या प्रवेशाच्या वेळी यशचे काका नरेश शेंदरे, ऑटो युनियनचे सदस्य मुकुंद उंब्रजकर, मुख्याध्यापक आशा हटवार, दत्तक पालक योजना प्रमुख श्री खिमेश बढिये, श्री भिमराव शिंदे मेश्राम, शाळेतील शिक्षक चित्रलेखा भोयर, श्री राजु भस्मे, लिखिता धांडे, श्री अमित मेंघरे, श्री किशोर जिभकाटे, अपर्णा बावनकुळे, शारदा समरीत, प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. या योजनेंतर्गत निराश्रित बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन निराश्रित दत्तक पालक योजनेचे प्रमुख श्री खिमेश बढिये व श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज