*कामठी येथे गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण*

*नगरसेविका संध्या रायबोले यांच्या प्रयत्नाला मिळाले यश*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – कामठी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ येथील गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले .
देशात कोरोना सारखी घातक महामारी बीमारी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र नगरसेविका संध्या रायबोले यांचा लक्षात येत यांनी गौतम नगरात ग्रीन जिम चे लोकार्पण करुन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्या करिता परिसरातील सर्व नागरिकांनी ग्रिन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले . ग्रिन जिम उपलब्ध करून दिल्या बद्दल नगरसेविका संध्या रायबोले यांनी आमदार टेकचंद सावरकर यांचे आभार मानले .
या प्रसंगी उज्वल रायबोले,विलास नागदेवे,हिमांशू बावनगडे,कुणाल गजबे, मिथुन चांदोरकर,हेमचंद आडे, सुभाष चांदुरकर,नंदू डांगे, शिशुपाल सोनडवले,अनिल बोरकर, सौरव पौनिकर,रोहन देशभ्रतार, संकेत झोडापे,सुबोध चांदोरकर,लखन डांगे,वसंत गजबे, विशाखा फुले, प्रियंका चहांदे,मीना दहाट,प्रमोद वर्णम,अजय पाचोली, सतिश जैस्वाल आदी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज