*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक*
*तिसरी लाट येण्यापुर्वी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाय योजना करण्याचे दिले निर्देश*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाराष्ट्र राज्यात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वाढल्याने नागपुर जिल्हाधिकाऱ्यांनी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेऊन तात्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहे.
मंगळवर दिनांक.६ जुलै २०२१ ला सकाळी ११:३० वाजता च्या सुमारास नागपुर जिल्हा जिल्हाधिकारी श्री रविंन्द्र ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्यापुर्वी कन्हान शहराचा दौरा करून प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे डाॅक्टर, कर्मचारीऱ्यांशी व संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सांगितले की प्रत्येक प्रसारक ची दर १५ दिवसा नी तपासनी करावी, सर्व खाजगी डॉक्टर ला लक्षणात्मक आजारी असल्यास आर.टी.पी.सी.आर ची टेस्ट पीएचसी मधुन करून घ्यावी जेन करून कोणी सुटनार नाही आणि सर्व खाजगी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कोव्हीड तपसानी करावी, पाॅजिटिव्ह पेंशंट ला दर २५ – ३० दिवस संपर्क करावे, पॉजिटिव्ह रूग्णाला सीसी सी मध्ये शिफ्ट करावे, जेणे करून आजाराचा प्रसार होणार नाही, सकारात्मक रूग्णांसाठी मध्यभागी अंदाजे ६ मिनिट चालणे व काही त्रास आढळल्यास तात्काळ कोव्हीड रुग्णालयात भर्ती करावे. सर्व खाजगी डॉक्टर साठी दर गुरुवारी ऑनलाईन जिल्हाधिकारी कार्यालय व डीएचओ कार्यालय, छाया माध्यमातुन कोव्हीड संबंधित प्रशिक्षण देण्यात येईल. तिसरी लाटे च्या उपाय योजना तात्काळ करावे, त्यामध्ये १८ + पेक्षा जास्त कोव्हीड लसीकरण होणे आवश्यक आहे. असे दिशा निर्देश देण्यात आले असुन सर्व आरोग्यदायी आणि कर्मचार्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे . या बैठकी मध्ये मा डॉ. फुटाणे, अतिरिक्त सी इओ जि प नागपूर, दीपक सेलोकर, बीडीओ श्री खाडेजी, अन्सारी, थोरे , डॉ योगेश चौधरी, डॉ काकडे, डॉ रोहित, धोतकरजी, पर्यवेक्षक पवार, गौरव भोयर आणि सर्व खाजगी डॉ मंडळी सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.