*मोदी सरकार च्या महांगाई विरोधात काँग्रेस ने साईकल रैली काढुन केले आंदोलन*

*महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – केंन्द्र सरकार ने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल आणि जीवनाशी निगडित वस्तुंचे प्रचंड दरवाढीच्या विरोधात काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव यांचा नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रैली काढुन मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करून महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली .
मंगळवार दिनांक १२ जुलै २०२१ ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष श्री नाना पटोले व नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष श्री राजेंद्र मुळक यांच्या आदेशानुसार पेट्रोल दरवाढ,गॅस सिलेंडर दरवाढ वाढती महंगाई च्या विरोधात मोदी सरकार च्या निषेर्धात कन्हान काँग्रेस कमेटी अध्यक्ष श्री राजेश यादव यांच्या नेतृत्वात गांधी चौक ते तारसा चौक पर्यंत सायकल मोर्चा काढून मोदी सरकार चा विरोधात तीव्र निर्दशने करुन महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली .

या प्रसंगी काँग्रेस कमेटी कन्हान शहर अध्यक्ष श्री राजेश यादव , प्रमोद बांते,गणेश माहोरे,रवींद्र रंग,पंकज गजभिये,कमलेश शर्मा,धर्मपाल बागडे,लालदेव शाहू,राजेंद्र सीरिया,सुभाष बोरकर,संदीप निखरा,गेंदलाल निंबोने,रोहित गजभिये,ओमा निंबोने,राजेश गुप्ता,अभिषेख यादव,सुरेश बारलिंगे, रतन यादव,सुरेश तिवाडे,तुषार यादव,मुकुल यादव,वंन्श खंडेलवाल,तुषार जुले सहित मोठ्या संख्येत काॅंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज