Breaking News

*टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी* *फिर्यादीं च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकाना चे ताले तोडुन नगदी रूपए व कोलड्रिंक्स केले चोरी*

*फिर्यादीं च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात अज्ञात चोरांनी तीन दुकानाचे ताले तोडुन दुकानातुन ७,००० रुपए नगदी व कोल्ड्रिंक्स ची काही बोटल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला वय ३५ वर्ष राहणार टेकाडी रोड माधव नगरी हा बेकरी चा धंदा करत असुन २ वर्षापासुन टेकाडी येथे शिवम मिष्ठान भंडार मिठाई ची दुकान चालवत असुन रोज सकाळी ८:०० वाजता दुकान खोलत असुन सायंकाळी ५:०० वाजता दुकान बंद करत होता .
फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला हा शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ चे सायंकाळी ५:०० वाजता दुकान बंद घरी गेला . फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला हा दुसर्या दिवशी शनिवार दिनांक १० जुलै २०२१ ला फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला हा सकाळी उठुन घरा बाहेर दुकाना कड़े गेला असता फिर्यादी मोनु राजकुमार शुक्ला यांना दुकानाचे दोन्ही ताले तुटले दिसले असुन फिर्यांदी यांच्या दुकाना बाजुला असलेले दोन दुकानाचे ताले तुटुन दिसल्याने फिर्यांदी यांनी या घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळा वर पोहचुन पाहणी केली असता फिर्यांदी मोनु राजकुमार शुक्ला यांच्या दुकानाचा लाॅकर तुटला दिसला व त्या मधुन सात हजार रूपए व कोलड्रिंक्स चे काही बोटल न दिसल्याने फिर्यांदी मोनु राजकुमार शुक्ला यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार टाकले असता कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २५४/२०२१ कलम ४५७,३८० भांदवि गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …