Breaking News

*कांन्द्री ला दोन युवकांना दोन आरोपींनी केली मारहाण* *कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*कांन्द्री ला दोन युवकांना दोन आरोपींनी केली मारहाण*

*कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री धन्यवाद गेट जवळ गाडीला कट मारल्याचा कारणावरुन दोन आरोपींनी बस चालक ला मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करित पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरुवार दिनांक.८ जुलै २०२१ ला सायंकाळी ५:३० ते ५:४५ वाजता दरम्यान बस क्रमांक. युपी ७३ अ ७९२२ चा चालक आफताब मोहम्मद नफिस वय ३३ वर्ष राह. वलनी खापरखेड़ा व त्याचे मित्रासह खापरखेडा वरून मनसर ला जात असतांना कांन्द्री येथील धन्यवाद गेट जवळ आरोपी १) अंकित त्रिपाठी २) परजित सिंग दोन्ही राहणार. कन्हान यांनी बस समोर मोटार सायकल आडवी लावुन गाडीत प्रवेश करून ” तु गाडीला कट का मारली” असे म्हणून फिर्यादी बस चालक व त्याच्या मित्रास हातबुक्यानी मारहाण जख्मी केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अप क्रमांक. २५२/२१ कलम ३४१,३२३,३४ भांदवि गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा नरेश वरकडे हे करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …