Breaking News

*आंगणवाडी च्या नविन लोखंडी गेटचे उद्घाटन*

*आंगणवाडी च्या नविन लोखंडी गेटचे उद्घाटन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग ७ येथील आंगणवाडी क्रमांक १४२ येथे नगरसेविका रेखा ताई टोहणे यांच्या निधीतुन लावलेल्या नविन लोंखंडी गेटचे उद्घाटन करण्यात आले.

बुधवार दिनांक .७ जुलै ला कन्हान पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक.७ येथील आंगनवाडी क्रमांक १४२ च्या शिक्षिका रंजनी अहीर व मदतनीस फुटाने मॅडम यांचा समक्ष नगरसेविका रेखाताई टोहणे यांच्या निधीतुन लावण्यात आलेल्या लोखंडी गेटचे प्रमुख पाहुण्या श्रीमती रिता बर्वे अध्यक्षा कन्हान शहर महिला कॉंग्रेस यांच्या हस्ते गेट ला पुष्पहार व श्रीफळ फोडुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने श्री नरेश भाऊ बवै नगरसेवक व उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी, योगेन्द्र भाऊ रंगारी नगरसेवक , मनीष भाऊ भिवगडे, विनय भाऊ यादव, रेखाताई टोहणे, गुंफाताई तिडके तसेच सुनीताताई मानकर, सौ सविता ताई बावणे, प्रदीप बावणे, सुप्रीत बावणे, ईश्प्रीत बावणे, वेदांत ऊके आदी काय॔कते उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …