Breaking News

*कन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी महंगाई विरोधात काढली दुचाकी ची मैय्यत* *मोदी सरकार विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली*

*कन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी महंगाई विरोधात काढली दुचाकी ची मैय्यत*

*मोदी सरकार विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – केंन्द्र सरकार ने पेट्रोल, डिझल, गॅस सिलेंडर व इतर वस्तुच्या केलेल्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात कन्हान येथे युवक काॅंग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांनी आंबेडकर चौक कन्हान येथुन तारसा चौक पर्यंत दुचाकी मोटार साईकल ची मैय्यत रैली काढुन मोदी सरकार च्या विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.


बुधवार दिनांक.१४ जुलै २०२१ ला महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टी चे महासचिव श्री. श्रिनावस नालमवार, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काॅंग्रेस अध्यक्ष श्री. राहुल सीरिया यांच्या मार्गदर्शनात रामटेक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पाटील, कन्हान शहर अध्यक्ष राजा यादव, नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस महासचिव आकिब सिद्धिकी, पारशिवनी तालुका युवक काँग्रेस महासचिव साहिल गजभिये सह आदिं च्या नेतृत्त्वात पेट्रोल, डिझल, गॅस सिलेंडर दरवाढ वाढती महंगाई च्या विरोधात मोदी सरकार च्या निषेर्धात रामटेक विधानसभा युवक काॅंग्रेस, पारशिवनी तालुका युवक काॅंग्रेस, कन्हान शहर युवक काॅंग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी आंबेडकर चौक ते तारसा चौक पर्यंत स्वाक्षरी अभियान व दुचाकी मोटार साईकल ची मैय्यत रैली काढुन मोदी सरकार च्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात जोरदार प्रदर्शन करित महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे . या प्रसंगी रोहित बर्वे, कृष्णाजी नाखले, अनस शेख, शांतनु राउत, हसन शेख, नरेश आरबी, बाबु कुरेशी, महेश धोगडे सह कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …