Breaking News

*कन्हान येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन*

*कन्हान येथे विविध विकास कामाचे भुमीपुजन*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक.१ राधाकृष्ण नगर, प्रभाग क्रमांक.२ गणेश नगर, प्रभाग क्रमांक ७ शिवाजी नगर, पटेल नगर येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले.


सोमवार दिनांक.१२ जुलै २०२१ ला सायंकाळी ५ वाजता रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार अँडोकेट आशिष जयस्वाल, कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, नगरसेवक अनिल ठाकरे, राजेश यादव, राजेंन्द्र शेंदरे, नगरसेविका सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, वर्षा लोंढे, मोनिका पौनिकर, वंदना कुरडकर, रेखा टोहणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, महिला उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोगले, शहर प्रमुख छोटु राणे, महिला शहर प्रमुख मनिषा चिखले यांच्या हस्ते नगर परिषद कन्हान- पिपरी येथे रोड निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक.१ च्या राधाकृष्ण नगर येथे श्री.वैद्य ते श्री.रवि धोटे यांच्या घरापर्यंत सी.सी रोड बांधकामासाठी ४,५८,६६२ रुपयांचे भुमिपुजन करण्यात आले असुन प्रभाग क्रमांक. २ च्या गणेश नगर येथे श्री अमरसेन ते पोस्ट ऑफीस ते बुद्ध बिहार ते दिगांबर मेश्राम यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजुला पेविक ब्लाॅक लावणे या करिता ३२,१९,४३३ रुपयाचे भुमिपुजन करण्यात आले. तसेच नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामा साठी ८,२३,३७० रुपयाचे भुमिपुजन करण्यात आले असुन दलितेत्तर योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक. ७ पटेल नगर येथील समाज भवन बांधकामा साठी ९,२३,६२० रुपयाचे भुमिपुजन करण्यात आले असुन समाज भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जोशीला ऊके, लता लुंडेरे, वैशाली श्रीखंडे, लीना हारोडे, कोमल लांजेवार, कुंदा मोटघरे, प्रेम रोडेकर, मुरलीधर येलुरे, सुनिल पिल्ले, भारत पगारे, हरीष तिडके, सोमनाथ राणे, चिंटु वाकुडकर, अजय चव्हान, उमेश आकोने, प्रदीप गाय कवाड, शुभम येलमुले, जुबेर खान, अनिकेत उपासे, अतुल सहारे, शुभम वंजारी, शिव कुरिल, निलेश चौरे सह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …