*गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कोविड योध्यांचा सत्कार*
*आमदार डॉ देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या हस्ते सत्कार*

*वैद्यकिय अधिक्षक डॉ दिपचंद सोयाम यांच्या नेतृत्वातील प्रशासनाची केली स्तुती*
*कोरोना पॉझिटिव्ह महिलांची डिलिव्हरी व नवजात बालकांचे कोविड पासून केलेले संरक्षण कौतुकास्पद*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली – जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड काळात उत्तम कार्य करित कोरोना पॉझिटिव्ह महिलांची यशस्वीपणे डिलिव्हरी करून होणाऱ्या नवजात बालकांचे कोरोना पासून संरक्षण करण्याचे केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी येथील रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी केले*
*याप्रसंगी जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिपचंदजी सोयाम, डॉक्टर तारकेश्वरजी उईके, डॉक्टर पेंदाम, वैद्यकिय अधिकारी, अधीपरीचारिका, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, यांचेसह उपस्थित कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे प्रामुख्याने उपस्थित होते*
*गडचिरोली जिल्हा केंद्रावर एकमेव असलेले जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा अनेक महिला प्रसूती करिता भरती होत असतात. कोरोनाच्या कठीण काळात पॉझिटिव्ह आलेल्या महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात एक वेगळे कक्ष तयार करण्यात आले व त्याच ठिकाणी त्यांची प्रसूती करण्यात येत होती. त्यांचे संचालन जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिपचंदजी सोयाम, यांच्या नेतृत्वातील टीमकडून करण्यात येत होते .त्याकाळात नवजात बालकाला कोरोणा होऊ नये व त्या मातेच्या जीवाला धोका पोहोचू नये याची विशेष काळजी घेतली गेली. प्रसूती धारक महिलांची व नवजात बालकांची योग्य काळजी घेत कोरोना प्रसार थांबविण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न अभिनंदनीय आहे*

*या रूग्णालयात बेडची व्यवस्था कमी मात्र भरती होणाऱ्यांची संख्या अधिक व त्यामानाने आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची संख्या कमी असल्याने त्याचा विपरीत परिणाम रूग्णालयाच्या व्यवस्थापनावर होत आहे . तरीही कोविडच्या कठीण काळात या रुग्णालयाच्या उत्तम सेवेमुळे महिलांचे व नवजात बालकांचे कोरोना पासून संरक्षण करण्यास यश मिळाले. येथील वैद्यकीय अधीक्षक हे उत्तम प्रकारे प्रशासन चालवीत असून त्यांच्या प्रशासनामुळे या रुग्णालयात उत्तम सुविधा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले. त्याबद्दल वैद्यकिय अधिक्षक डॉ दिपचंद सोयाम व त्यांच्या टीमचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*
Maharashtra News Media सच की आवाज