Breaking News

*तेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान वाटप* *तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम*

*तेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान वाटप*

*तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्याकडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार, गरजु लोकांना कपड़े व अन्नधान्य दान या उपक्रमांतर्गत कन्हान सत्रापुर येथील अंत्यत गरजु , अपंग, लोकांना गहु, तांदुळाचे अन्न धान्य व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंन्द्रशेखर आरगुलेवार यांचा कडुन नवीन कपड़े, टॉवेल दान करण्यात आले. वर्ष २०२० च्या डिसेंबर महिन्यात कामठी येथे सग्या दोन ही बहिनी चा भुकेने व्याकुळ होऊन घरीच मुत्यु झाला होता. अशी दुर्दैवी घटना भविष्यात कधी घडु नये या ची दखल घेत तेजस बहुउद्देशिय संस्था कामठी व्दारे दान दाते संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक महेन्द्रजी भुटानी, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय मलाचे, वरिष्ठ मार्गदर्शक सुनील चोखारे, सहयोगी सीए शिल्पी टिड वाल, बबलु तिवारी, राजु अग्रवाल, अशोक धबोड़कर, निर्मल दवानी, मनोज बत्रा, विजय कोंडुलवार, सागर मदनकर, संदीप यादव, अजय आकरिया, शुधोधन पाटिल, प्रमोद टेंबुरनिकर, प्रविण शर्मा , रहीम शेख, चंद्रशेखर आरगुलेवार व्दारा गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य सतत दान करत असतात . “भुकेल्यास एक मुठ अन्न आपले ” या उपक्रमाचा साईमंदीर कामठी-कन्हान येथे दिनांक.२६ जानेवारी २०२१ ला शुभारंभ करून फेब्रुवारी पासुन दर महिन्याच्या ३ तारखेनंतर गरजुकडे जावुन अन्नधान्य दान करणे नियमित सुरू आहे. यांच उपक्रमांतर्गत दि. ४,६, व ७ जुन २०२१ ला कामठी च्या अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान केले. चंद्रशेखर आरगुलेवार यांचे वडीलांचा दिनांक.५ जुलै ला मुत्यु झाल्याने त्या तारखेला अन्नधान्य वाटप न करता दिनांक.१६ जुलै २०२१ ला सत्रापुर येथे तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, दीपचंद शेंडे, सदस्य मिस्बाहऊर रहमान , नरेंद्र शिंदे, सेवक शिंदे, सुभाम केवट, सुनील केवट, ट्रेनीज भारती कनोजे, उत्कर्ष कोचे, शीतल चौधरी, अभय पेटारे, अरुण भुते, राधेश्याम, उमेश, सोहेल शेख आदीं च्या उपस्थितीत निराधार, गरीब गरजुंना तेजस संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कपडे व १०-१० किलो गहु, तांदुळाचे अन्न धान्य वाटप करण्यात आले. तेजस संस्थेच्या ” भुकेल्यास एक मुठ अन्न आपले “या अंपग, गरजु नागरिकांना दर महिन्याला वितरण करित तेजस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आरगुलेवार यांचे सेवाभावी हाथ सदैव मानवते करिता प्रर्यंत्नशिल आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …