*निशुल्क रोग निदान व औषध वितरण शिबिर*

*अन्नधान्य वितरण, वस्त्र परिधान वितरण, मास व सॅनिटायझर वितरण*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधीी- दिलीप येवले
नागपूर : :- आनंद मार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम व श्रीहरी एंटरटेनमेंट न्यू जर्सी यु एस ए द्वारा आयोजित निशुल्क रोग निदान व औषध वितरण शिबिर, अन्नधान्य वितरण, वस्त्र परिधान वितरण, मास व सॅनिटायझर वितरण, शीतला माता देवस्थान पंचकमिटी सोनझारी नगर, नागपूर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिसेस नीता मुजुमदार रामेकर (अमेरिका) कार्यक्रमाचे उद्घाटक नगरसेविक रिता मुळे, विशेष अतिथी आचार्य अविंद्रा आनंद अवधूत (पश्चिम बंगाल, कलकत्ता), आनंद मार्ग संस्थाचे व्यवस्थापक स्वामी शिवा आत्मानंद जी, बंजारी समाजाचे अध्यक्ष रमेश बेहेरे महागुरू अर्जून बेहेरे वरिष्ठ पत्रकार प्रवीण विघरे, संयोजक निखिल भुते बडा ताजबाग चे मौलाना इरशाद, मिसेस नागपुर विजेत्या रवीना दाडे प्रवीण दाढे, दीदी आर एस एल मुंबई कोरोना च्या यासंकट काळात अनेक नागरिक कोरोनाग्रस्त आणि चिंताग्रस्त झाले आहे. सर्वांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी विशेष उपक्रम करण्यात आला. निशुल्क रोग निदान व औषध वितरण शिबिर 300 नागरिकांनी लाभ घेतला , अन्नधान्य (रेशन किट) व वस्त्र परिधान वितरण 200 नागरिकांनी घेतला, तसेच शेकडो नागरिकांना मास व सॅनिटायझर वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या किरण बेहेरे, नितीन गावरे, चंद्रकांत गावरे, चंद्रशेखर भीमारे संजय शिंत्रे, तसेच भरपूर नागरिकांचे सहकार्य लाभले.
Maharashtra News Media सच की आवाज