*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ अध्यक्षपदी सूर्यकांत उईके तर विदर्भ जनरल सेक्रेटरी पदी दिनेश शेराम यांची नियुक्ती*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले
नागपुर:- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली,विदर्भ विभागाची बैठक नुकतीच दिनांक ११/०७/२०२१ रोजी मानेवाडा,नागपूर येथे संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी एड. मणीराम मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोणा काळात दिवंगत झालेले परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर प्रकृती व वयोमानामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,विदर्भ अध्यक्ष एड. मणीराम मडावी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन विदर्भ कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली,सर्व संमतीने राजीनामा मंजूर करून परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी यांनी विदर्भ अध्यक्ष पदी श्री.सूर्यकांत उईके व विदर्भ जनरल सेक्रेटरी पदी श्री.दिनेश शेराम यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला श्री.नारायण मडावी यांनी अनुमोदन दिले,सर्व संमतीने नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.आपल्या नियुक्ती बाबत बोलता श्री.सूर्यकांत उईके म्हणाले की,”माजी केंद्रीय मंत्री,खा.कार्तिक ओराव यांनी संपूर्ण भारत देशातील सर्व आदिवासी समाजाला एकत्र आणण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची स्थापना केली,माजी राज्य मंत्री बाबुराव मडावी,माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी मंत्री वसंत पूरके,माजी मंत्री स्वरूप सिंह नाईक यांनी संघटनेचा वट वृक्ष केला त्यांचा आदर्श घेत आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल”.नव नियुक्त विदर्भ जनरल सेक्रेटरी दिनेश शेराम म्हणाले की,”विद्यार्थी दशेपासून आदिवासी विकास परिषदेच्या विविध पदांवर केलेल्या कामाच्या अनुभवा वर संपूर्ण विदर्भात ज्येष्ठ पदाधिकारी,युवक,विद्यार्थी,महिला यांचे मजबूत संघटन तयार करून आदिवासींच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणा करिता सदैव तत्पर असेल.” सर्वांचे आभार व्यक्त करून सभा संपन्न झाली.
Maharashtra News Media सच की आवाज