*विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञाच्या क्षेत्रात आलेल्या संधीचे सोने करुन घ्यावे –डॉ .शरयु तायवाडे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- प्लेसमेंट सेल व संगणक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने तसेच *” कोड इनसाईट अकँडेमी”* यांच्या सौजन्याने तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे सात दिवसीय *एम्पाँऐबिलीटी स्कील डेव्हलपमेंट फाँर आय. टी.इंडस्ट्री* या वर्कशाँप चे आयोजन करण्यात आले. या वर्कशाँपच्या उद् घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयु तायवाडे, प्रमुख अतिथी म्हणून डाँ. प्रियंका बागडे, प्रमुख वक्ते श्री. शैलेश सोनारे, कार्यक्रमाचे आयोजक डाँ. गिरीश काटकर व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डाँ. दिलीप चाफले आभासी मंचावर उपस्थीत होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संगणक शास्त्राचे समस्त विद्यार्थीगण यांनी उपस्थीती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय तसेच सेलने आजपर्यत केलेले कार्याचा आलेख डाँ. दिलीप चाफले यांनी मांडला. कार्यक्रमाचे आयोजक डाँ. गिरीश काटकर यांनी या वर्कशाँपच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातुन डाँ. शरयु तायवाडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी कसल्याही प्रकारे मागे पडु नये आपल्या मनातील न्युनगंड बाजुला ठेवुन हे वर्कशाँप पुर्ण करावे व इनफाँरमेशन टेक्नोलाँजी क्षेत्रात आलेल्या संधीचे सोने करून घ्यावे असा संदेश देत , कार्यक्रमाच्या यशस्वी शभेच्छ्या दिल्या. कार्यक्रमाकरीता डाँ. रामटेके व डाँ. डाबरे यांचे सहकार्य लाभले.
Maharashtra News Media सच की आवाज